साईबाबा नागरी बँकेला 4कोटी 37 लाखाचा नफा-हेमंतराव आडळकर यांची माहीती

0 51

सेलू ( नारायण पाटील )
बँकेच्या आतापर्यंतच्या प्रगतीत संचालक मंडळ ,सभासद ठेवीदार तसेच कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा असून ग्राहकांच्या विश्वासास ही बँक पात्र ठरली असून भविष्यात देखील त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही .असे प्रतिपादन येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी पत्रकार परिषदेत केले .
येथील सतत दहा वर्षा पासून बॅको पुरस्कार, महाराष्ट्र स्टेट कॉ ऑप असोसिएशन चा पद्मभूषण कै वसंत दादा पाटील उत्कृष्ट नागरी सह बंक पुरस्कार, व बेस्ट चेअरमन पुरस्कार मिळवनाऱ्या साईबाबा बॅकेच्या
मार्च 2024अखेर सर्व टॅक्स व तरतुदी वजा जाता 1कोटी 90 लाख रूपये नफा झाला आहे यात ढोबळ नफा 4 कोटी 37लाख झाला आहे संपलेल्या आर्थिक वर्षात बँक कडे भाग भांडवलं 6कोटी 2 लाख आहे एकून स्व निधी 15कोटी 83लक्ष आहे मार्च अखेर ठेवी 210 कोटी 68लाख आहेत कर्ज वाटप कोटी 120कोटी आहेत बँकेचे नेट एन पि ए 0.% ग्रास एन. पि. ए. 6.28 % आहे. एकूण सभासद 8896 आहेत सर्व शाखा नफ्यात आहेत दहा वर्षा पासून सभासद ना 10% वाटप करीत आहोत या पुढे बँकेचा
नेट एन .पि. ए .श्यून्य टक्के राहील या दृष्टीं ने नियोजन असल्याचे माहिती आडळकर यांनी दिली . ग्राहकांनी जास्ती जास्त ए टि एम, पि ओ एस, इ कॉम, मोबाईल बँकिंग, क्यू आर कोडं,आय एम पि एस, आर टि जी एस,युपीआय अशा आधुनिक तंत्र ज्ञान व सुविधा चा वापर करावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी बोलतांना केले. बँके च्या सर्व स्तरावर प्रगती मध्ये बँके चे सभासद,संचालक मंडळ,ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक,कर्मचारी यांनी केलेल्या अमूल्य सह कार्य साठी त्यांनी यावेळी आभार मानले .
कै. अण्णा साहेब काकडे सेवाभावी संस्था तर्फे “सन्मान कर्तत्वाचा” पत्रकार क्षेत्रा मध्ये श्री मोहन बोराडे यांना मिळाला या बद्दल बोराडे यांचा सत्कार करण्यात आला .
या वेळी बँकेचे उपाध्यक्ष मुळावेकर चंद्रशेखर
मुख्यकार्यकारी अधिकारी श्री रामराव लाडाने, व्यवस्थापक श्री निसार पठाण सभासद श्री रफिक भाई आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार मुख्यकार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांनी मानले .यावेळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

error: Content is protected !!