सान्वी शितळेची सैनिक स्कुल सातारा व नवोदय विद्यालय परभणी प्रवेशासाठी निवड

0 34

सेलू ( प्रतिनिधी )
येथील नूतन विद्यालयातील इयत्ता 5 वित शिकत असलेली विद्यार्थिनी सान्वी गजानन शितळे हिने ऑल इंडिया सैनिक स्कुल प्रवेश परीक्षा 2024 मध्ये 300 पैकी 274 गुण घेऊन ओबीसी प्रवर्गात मुलींमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली व ओबीसी प्रवर्ग मुलींसाठी असलेल्या एकमेव जागेसाठी तिची निवड झाली आहे.त्याचबरोबर नुकताच जाहीर झालेल्या निकालामध्ये नवोदय विद्यालय परभणी प्रवेशासाठी तिची निवड झाली आहे.या दोन्ही परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल नूतन विद्यालयात तिचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले.या प्रसंगी मुख्याध्यापक पाटील सर,पर्यवेक्षक देशपांडे सर,सोंन्नेकर सर,कडे सर,पल्लेवाड सर,कडगे सर,तोरणाळे सर,कपाटे सर,हिवाळे सर,आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!