पुर्णा तालुक्यात समीर दुधगावकर यांचे ग्रामस्थांनी केले आपुलकीने स्वागत

0 154

परभणी,दि 12 ः
परभणी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांनी आज शुक्रवार दिनांक 12 एप्रिल रोजी पूर्ण तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे आपुलकीने स्वागत करत  त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर, कात्नेश्वर, आहेरवाडी, माटेगाव आणि पूर्णा शहर येथे समीर दुधगावकर यांच्या प्रचार  कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री, माजी खासदार ऍडव्होकेट गणेशराव (बापुसाहेब) दुधगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बापुसाहेब दुधगावकर यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या भेटी घेत संवाद साधला. यावेळी बापूसाहेब दुधगावकर यांचे सर्व जुने कार्यकर्ते, सहकारी यावेळी उपस्थित होते. समीर दुधगावकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा विश्वास यावेळी बापू साहेबांच्या सहकार्यानी दिला. यावेळी हाश्मी साहेब भानुदासराव शिंदे, धाराजी भुसारे, डॉ. सखाराम काळे,कोंडीबा कदम, केशवराव कदम, सटवाजी मामा मोरे, देविदास चापके शाहुराव भुसारे, सरपंच उत्तमराव ढोणे, प्रकाश करहाळे, , सिताराम देसाई, सचिन देसाई  आदी उपस्थित होते.एक भुमीपुत्र,जिल्ह्याच्या प्रश्नांची जाण असलेले आणि उच्चशिक्षीत उमेदवार म्हणून समीर दुधगावकर यांना संधी द्यावी असे आवाहन यावेळी प्रा.व्यंकटेश काळे,धाराजी भुसारे यांनी केले.

चुडावा,गौर, जि.प. सर्कल मधील सर्व मराठा आंदोलकानी एकच मिशन मराठा …कुणबी मराठा आरक्षण घोषणा देत अध्यादेश काढण्या बाबतीत समीर दुधगावकर यांनी बॉन्ड  दिल्या बद्दल स्वागत करीत निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला. त्यात धनुभाऊ देसाई यांनी पुढाकार घेत… संघर्षाची जिम्मेदारी स्वतः चया खांद्यावर घेतली.

error: Content is protected !!