मागील २० दिवसापासून मार्केट यार्ड मध्ये कापसाची खरेदी बंद

सन्मानजनक तोडगा काढण्याची मागणी

0 21

सेलू / नारायण पाटील – मागील २० दिवसापासून मार्केट यार्ड मध्ये व्यापाऱ्यांनी मार्केट यार्ड मध्ये कापूस खरेदीवर बहिष्कार टाकल्या मुळे मागील २० दिवसापासून यार्ड मधील खरेदी बंद आहे .त्यामुळे मार्केट कमिटीचे उत्पन्न घटत कर्मचाऱ्यांचे पगार देखील थकीत झाले आहेत .तरी या प्रकरणी सन्मानजनक तोडगा काढावा अशी मागणी संचालकांनी सहायक निबंधक यांच्या कडे केली आहे .

 

 

दि ७/३/२४ रोजी बाजार समितीत झालेल्या संचालकांच्या मासिक सभेत वाद होऊन व्यापारी वर्गाबाबत अपशब्द वापरून व्यापाऱ्याला मारहाण देखील करण्यात आली होती .यामुळे व्यापाऱ्यांनी मार्केट यार्ड मधील लिलावात कापूस खरेदी करण्यावर बहिष्कार टाकला होता .याबाबत अनेक वेळा तडजोड करण्याचे सर्व स्तरातून प्रयत्न झाले .परंतु कोणीच आपल्या भूमिके पासून माघार घेण्यास तयार नसल्यामुळे अजूनही तोडगा निघू शकला नाही .त्यामुळे २० दिवसापासून मार्केट यार्ड मधील कापूस खरेदी बंद आहे .परिणामी यामुळे बाजार समितीचे उत्पन्न घटत असून कर्मचाऱ्यांचे पगार देखील थकीत झाले आहेत .यामध्ये एक बैठक घेऊन सन्मानजनक तोडगा काढवा .अशी मागणी बाजार समितीचे संचालक डॉ संजय रोडगे यांच्या नेत्रत्वाखाली संचालकांच्या वतीने सहायक निबंधक,सेलू व बाजार समिती सचिव यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .

 

 

या निवेदनावर डॉ संजय रोडगे ,शैलेश तोष्णीवाल ,रामेश्वर राठी , ऍड दत्तराव कदम ,वर्षा केशवराव सोळंके ,गोकर्णा भास्करराव पडघन ,अनिल पवार ,गणेश आकात ,अनिता ज्ञानेश्वर ताठे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .

error: Content is protected !!