सेलू -डिग्रस रस्त्याची दुरावस्था कायम; ट्रॅक्टर उलटून झाला अपघात

0 100

सेलू, प्रतिनिधी – गेल्या कित्येक दिवसापासून सेलू – डिग्रस रस्त्याची दुरावस्था झाली असून वेळोवेळी मागणी केल्यानंतर कसेबसे काम सुरू झाले परंतु ते अत्यंत संथ गतीने होत असल्यामुळे जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे .
त्यातच आज या रस्त्यावर खड्यामध्ये कापसाचा ट्रॅक्टर उलटून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .

 

पाटोदा येथील मोहन पांडुरंग बोराडे m H 21B Q 0675 या वाहनातून अंदाजे २५ क्विंटल कापूस भरून सेलू येथे विक्रीसाठी घेऊन येत होते . त्यातच रस्ता खराब असल्यामुळे हा कापसाने भरलेला ट्रॅक्टर अचानकच पलटी झाला .व सर्व कापूस रस्त्यावर अस्ताव्यस्त पडला व यामध्ये ५ ते ६ क्विंटल कापसाचे नुकसान झाले .कापसाची प्रत खराब झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे .
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही .हेच नशीब .आता तरी आतातरी या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावा अशी मागणी जोर धरीत आहे .

error: Content is protected !!