विवेकानंद प्राथमिक विद्यालयात लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन

0 72

सेलू,दि 12 (प्रतिनिधी)ः
येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शंकर शितोळे ,प्रमुख वक्ते विजय चौधरी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.विजय चौधरी यांनी स्व.मुंडे साहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला ,त्यांची संघर्षमय वाटचाल व राजकीय कारकीर्द यांची माहिती दिली. मु.अ.शितोळे यांनी भारतीय शिक्षण प्रसारक संस्था व मुंडे साहेब यांचे अतुट नाते कसे होते ते प्रतिपादित केले.
सूत्रसंचालन व आभार कु.सानिका इघारे हिने केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंकर राऊत ,अनिल कौसडीकर ,अभिषेक राजूरकर स्वप्नाली देवडे यांनी प्रयत्न केले.

error: Content is protected !!