शुक्रवार पासून सकल मराठा समाजाचे गाव तिथे धरणे आंदोलन व साखळी उपोषण

0 30

परभणी / प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यासह परभणी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी (आंदोलन स्थळ) 27 ऑक्टोबर 2023 पासून मराठा समाजाच्या व्यक्तींना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी सकळ मराठा समाजाच्या वतीने साखळी धरणे सुरू केली आहेत या आंदोलनात १ डिसेंबर 2023 पासून संख्यात्मक वाढ करण्यात येणार असल्याचे निवेदन परभणी जिल्हाधिकारी व परभणी तहसीलदार यांना सकाळ मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले असून या आंदोलनात जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सकळ मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे

संपूर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील व्यक्तींना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी या प्रवर्गात समावेश करावा या मागणी साठी 26 ऑक्टोबर 2023 पासून आमरण उपोषण सुरू केले होते त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून परभणी जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर 27 ऑक्टोबर 2023 पासून साखळी धरणे आंदोलन सुरू केले होते त्या धरणे आंदोलनाला आज 35 दिवस पूर्ण होत आहेत या नियोजित आंदोलनाच्या पुढील दिशेच्या अनुषंगाने आंदोलनात संख्यात्मक वाढ करून १ डिसेंबर 2023 पासून गाव तिथे साखळी धरणे आंदोलन सुरू केले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून परभणी शहरातही संख्यात्मक वाढीव साखळी धरणे आंदोलन केली जाणार आहेत.हे सकळ मराठा समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने शांततेत होणार आहे यासंदर्भाचे निवेदन जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना आज दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील सर्व गावात होणाऱ्या या धरणे आंदोलनात जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!