ऐतिहासिक वास्तूंचे विद्यार्थ्यांनी जाणून घेतले महत्त्व

विवेकानंद विद्यालयाची शैक्षणिक सहल

0 19

सेलू / प्रतिनिधी – येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालयाची शैक्षणिक सहल दिनांक ०१ मार्च ( शुक्रवार ) रोजी पार पडली.सदरील सहलीत श्री.भद्रा मारोती ,वेरूळ येथील कैलास लेणी ,श्री.घृष्णेश्वर मंदिर ,दौलताबाद किल्ला या ठिकाणांना भेट देण्यात आली.

 

ऐतिहासिक ,धार्मिक स्थळांच्या माध्यमातून प्राचीन शिल्पांची तसेच आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची माहिती होते यासाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते.सहलीत विद्यार्थ्यांनी प्रेक्षणीय स्थळे पाहुन माहिती घेण्यासोबतच एकत्रितपणे खेळण्याचा देखील मनमुरादपणे आनंद घेतला .

 

या सहल नियोजनात मु.अ. शंकर शितोळे ,सहलप्रमुख अनिल कौसडीकर ,गजानन साळवे ,विजय चौधरी ,शंकर राऊत ,स्वप्नाली देवढे ,शारदा पुरी यांचा सहभाग होता.

error: Content is protected !!