विवेकानंद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाली विज्ञानाची अनुभूती

केरवाडी येथील डिस्कवरी सायन्स सेंटरला भेट

0 50

 

सेलू, प्रतिनिधी – येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी केरवाडी ता. पालम जि.परभणी येथील डिस्कवरी सायन्स सेंटरला भेट दिली.

 

यावेळी सायन्स सेंटर चे विष्णू जाधव यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानातील प्रयोगांची विस्तृत माहिती देऊन सादरीकरण करून दाखवले तसेच विज्ञान विषयक विविध पैलू उलगडून दाखवले.विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सहलीचा खूप आनंद लुटला.यावेळी सहल प्रमुख अनिल कौसडीकर,सहशिक्षक विजय चौधरी,सौ.शारदा पुरी,सौ. स्वप्नाली देवडे,अभिषेक राजूरकर,विशाल सोनवणे यांनी शैक्षणिक सहल यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

error: Content is protected !!