सुभाष मोहकरे यांना महाराष्ट्र गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानीत

0 43

 

सेलू -जीवन ज्योत कला प्रतिष्ठान ,महाराष्ट्र व जगदंबा विश्वस्त संस्था,परभणी आयोजित उतुंग भरारी शैक्षणिक कला व सामाजिक परिषद ,परभणी यांच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र गुणवंत शिक्षक ,पुरस्कार (२०२२ ) हा यावर्षी शारदा विद्यालयातील शिक्षक सुभाष मोहकरे यांना देण्यात आला आहे .
परभणी येथे दि १३ औगस्ट राजी बी रघुनाथ सभागृहात आई कुठे काय करते या मालिकेत आप्पाची भूमिका साकारलेले सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते किशोर महाबोले यांच्या शुभहस्ते मोहकरे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे . यावेळी रत्नागिरीच्या सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ सीमा चौधरी ,
प्रतिष्ठान चे अध्यक्ष हनुमंत सावंत ,राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक एम एम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती .
राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन समाज ऋण फेडण्यासाठी आपण महान कार्य करीत आहात .सामाजिक बांधिलकीची जाण व भान ठेवून समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी महान कार्य करून प्रेरणा देत आहात .अशी विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करून लौकिकात भर घातल्यामुळे सन्मानपूर्वक हे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे .

error: Content is protected !!