शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या फुलवळ येथील मोहर्रमला सुरुवात

0 131

 

कंधार, उमर शेख – फुलवळ ता.कंधार येथील मोहर्रम ला शेकडो वर्षाची परंपरा असून फुलवळ येथे हा उत्सव हिंदू – मुस्लिम बांधव एकत्रित येवून मोठ्या उत्साहात साजरा करतांना सामाजिक बांधिलकी जपत हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतिक दाखवून देतात .

 

यंदा ही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून ता. ५ ऑगस्ट रोज शुक्रवारी सुरुवात होणाऱ्या मोहर्रम मध्ये शुक्रवारी रात्री मौलाअली उठणार आहे तर ता. ६ ऑगस्ट रोज शनिवारी रात्री काशीमदुल्हा उठणार आहे . ता. ७ ऑगस्ट रोजी नालेहैदर , ता. ८ ऑगस्ट रोजी डोला आणी ता. ९ ऑगस्ट रोजी दहावी म्हणजेच ची सांगता होणार आहे .

 

मोहर्रम म्हटले की फुलवळ येथे जातिभेत विसरून मुस्लिम बांधवांच्या अगोदर हिंदू बांधवच पुढाकार घेऊन मोहर्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत असतात , गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे प्रत्येकालाच आपापला जीव वाचवायचे पडले होते त्यामुळे मोहर्रम मध्ये ही नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून तो उत्साह कमी झाला होता पण यंदा तोच उत्साह पुन्हा सर्वांच्या मनात भरला असल्याने मोहर्रम उत्साहात साजरा होणारा असल्याचे बोलले जात आहे.

error: Content is protected !!