आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा निमित्त झेंडा विक्री केंद्राचे उद्घाटन व मोटरसायकल रॅली

0 58

पूर्णा, सुशिलकुमार दळवी – शहरामध्ये नगर परिषद पूर्णा मार्फत विविध
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने आजादी का अमृत मोहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियान अंतर्गत झेंडा विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस स्टेशन पूर्णाचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, नगर परिषदे चे मुख्याधिकारी अजय नरळे, सहापोलीस निरीक्षक गायकवाड हे उपस्थित होते.

 

देशाच्या स्वतंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होण्याच्या अनुषंगाने प्रत्येक नागरिकांनी आपल्या
घरावर दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत झेंडा लावणेसाठी जनजागृती करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले.

 

यावेळी सुजाण नागरिकांकडून झेंडा फडकावत असताना घ्यावयाच्या दक्षता,राष्ट्रीय
ध्वजाचा सन्मान राखणे हे आपले कर्तव्य असून या तीन दिवसाच्या काळात वैयक्तिक घरावर ध्वज फडकवताना सायंकाळी उतरवण्याची आवश्यकता नसल्याचे प्रतिपादन मुख्याधिकारी नरळे यांनी केले.

 

या कार्याक्रमा सोबत शहरात नगर परिषद कर्मचारी मार्फत बाईक रैलीचे आयोजन,
महिला बाल विकास सक्षमीकरण करण्यासाठी नगर पालिकेचे राजाराम बापू सभागृह येथे दिनांक ०८ ऑगस्ट पासून कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

 

आजादी का अमृत मोहोत्सव अंतर्गत शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,
अभिनव विद्या विहार, जय हिंद इंग्लिश स्कूल परिसरात वृक्ष लागवड करण्यात आले.

 

कार्यक्रमास शहरातील नागरिक, प्रतिष्ठीत व्यापारी राजेश नंदालाल धूत, सुनील डोबेवार, डॉ.कदम, आनंद अजमेरा, अर्जुन शिंदे, कस्तुरबा गांधी विद्यालया चे विध्यार्थी शिक्षक, तसेच नगर परिषद सर्व कर्मचारी यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन मयूर महाजन तर आभार अभियंता सिद्धार्थ गायकवाड यांनी मानले.

error: Content is protected !!