पूर्णेत गाढवांचे राज्य,अन लाथांचा सुकाळ

गाढवांचा हैदोस,प्रशासन मुग गिळून गप्प का?

0 210

 

पुर्णा शहरातील मिरवणुक” श्रींची “पण चर्चा कुचकामी व्यवस्थेची

पूर्णा / केदार पाथरकर – पुर्णा शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणपती उत्सव आनंदात पार पडला, दुखहर्ता विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी वरुणराजा बरसल्याने भक्तगणही सुखावले.यंदाच्या मिरवणुकीतील देखाव्यांनी प्रबोधनाचे काम केले यात लक्ष वेधले ते “श्रीराम गणेश मंडळाच्या” देखाव्याने स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे गाढवांनी शहराला वेठीस धरले असुन षंढ नप ढुंकूनही लक्ष द्यायला तयार नाही, शहरात माणसे कमी अन गाढवं च जास्त राहतात काय? असा प्रश्न नागरिकांना पढल्याशिवाय राहत नाही, शहरातील तमाम रस्ते ,चौक, नाल्या इतकेच काय तर बँकांच्या एटीम मध्येही गाढवांनी ठाण मांडले आहे, आधीच मुख्य रस्त्यांवरचे अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकामे आणि बॅनर च्या विळख्यात अडकलेल्या शहराच्या दुराव्यावस्थेत गाढवांनी भर टाकली,शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक , दिव्यांगजण यांच्यासाठी तर शहरातील रस्त्यांवर चालणे दुरापास्तच , आम्ही पत्रकार बांधवांनी वेळोवेळी याविरुद्ध जनतेला होणाऱ्या त्रासाबद्दल वेळोवेळी लिहिले फोटो पण टाकले पण गेंड्याची कातडी असणाऱ्या अधिकाऱ्यांना काहीएक फरक पडला नाही, बरं या गाढवांचा उपयोग काय तर रात्री नदीपात्रातील वाळु उपसा, हे उघड उघड दिसत असुनही महसुल विभाग कार्यवाही करतांना दिसुन येत नाही, यामुळे तहसील प्रशासन , नगरपालिका प्रशासन आणि वाळु माफिया यांच्यात साटेलोटे तर नाहीना अशी शंका घेण्यास वाव आहे. शहरासाठी यमदुत ठरत असलेल्या गाढवांच्या मालकांवर कार्यवाही करावी असाही एक सूर निघत आहे, हे मालक कोण आहेत ते राजकीय पक्षांशी संबंधित आहेत का? हे तपासणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था शहराच्या व्यवस्थापनासाठी असतात कि फक्त निधी चा विल्हेवाट लावण्यासाठी ? असा प्रश्न आम जनतेत निर्माण झाला आहे.देखाव्यातुन शहराचे प्रतिबिंब दिसल्यावर तरी बेशरम प्रशासन कार्यवाही करेल का? हे पहाणे आता औत्सुक्याचे ठरेल.

error: Content is protected !!