राष्ट्रवादी काँग्रेसची मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी…

0 24

मुंबई दि. ३० नोव्हेंबर – गद्दारीचा किडा मंगलप्रभात लोढा… पन्नास खोके एकदम ओके… छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात त्यांच्याच मलबार हिल विधानसभा मतदारसंघात जोरदार आंदोलन करण्यात आले.

भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीशी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आज पुन्हा एकदा आक्रमक झालेली पहायला मिळाली.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे व कार्याध्यक्षा राखीताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज मंगलप्रभात लोढा यांच्या मतदारसंघातच हे जोरदार आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष राज राजापूरकर, प्रदेश संघटक सचिव भालचंद्र शिरोळे, मुंबई उपाध्यक्ष बाप्पा सावंत, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत दिवटे, मुंबादेवी तालुकाध्यक्ष प्रविण ठाकूर, मलबार हिल तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, वरळी तालुकाध्यक्ष रवी मयेकर, दक्षिण मुंबई अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अयुब मेमन,मुंबई सोशल मिडिया समन्वयक दिपक पारडीवाला आदींसह पक्षाचे पदाधिकारी, वॉर्ड अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.

तर दुसरीकडे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!