चिंब भिजलेल्या बाल वारकऱ्यांकडून सेलूत विठूनामाचा गजर

0 94

 

सेलू, प्रतिनिधी – आज आषाढी एकादशीचे निमित्त साधून शहरातील सर्व शाळांनी दिंड्याचे आयोजन केले होते . दिंड्या निघताच वरुण राजा बरसल्याने अक्षरशः सर्व बाल वारकरी चिंब भिजून गेले होते .तरी देखील त्यांचा उत्साह मात्र कमी झाला नाही .ढोल ताश्याच्या व टाळ मृदुगांच्या गजरात विठू नामाचा गजर केला जात होता .त्यामुळे संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते.

 

काल रात्री जोरदार पाऊस झाला व आज देखील सकाळ पासूनच ढगांनी गर्दी केली होती .त्यामुळे दिंडी निघती का नाही या विवंचनेत विद्यार्थी होते .परंतु सकाळी पाऊस नसल्याने दिंडी काढण्याचा निर्णय सर्व शाळांनी घेतला .व मोठ्या उत्साहात विद्यार्थी देखील पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते .परंतु दिंड्या सुरू झाल्यानंतर पावसाची रिपरिप सुरू झाली .परंतु उत्साही विद्यार्थ्यांनी याची तमा न बाळगता अक्षरशः चिंब भिजून देखील विठू नामाचा जयघोष चालूच ठेवला .व संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.

 

या बाल वारकऱ्यांच्या उत्साहाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने विविध पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने जागोजागी फराळ वाटप करण्यात आला. या शालेय दिंड्या बरोबरच येथील शेरे गल्ली तील विठ्ठल मंदिर महिला भजनी मंडळाची देखील दिंडी काढण्यात आली होती .यामध्ये शाळांनी विविध देखावे देखील सादर केले होते .के बा विद्यालयाच्या लेझीम पथकाने प्रेक्षकांची मने आकर्षित केली.

 

या दिंड्या मुळे विठुरायाच्या गजराने सेलू शहर अक्षरशः दुमदुमून गेले होते.यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जागोजागी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.दिंड्या संपल्यानंतर शहरातील रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याचा त्रास होऊ नये व स्वछता राहावी.

error: Content is protected !!