राज्यातील 30 धरणे भरली, पावसाचा धुमाकूळ

0 144

पुणे – यावर्षी पाऊस काहीसा उशिरा सुरु झाला, असे असताना आता मात्र राज्यात सर्वत्र पावसाने सुरुवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांची शेतातील कामांची लगबग सुरु झाली आहे. कोकणात दमदार पावसाने सुरुवात केली असून या अनेक धरणे भरली आहेत. सध्या कोकणासह मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात अधिकचा पाऊस झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. यामुळे शेतकरी आनंदात आहे.

 

ज्या (Kokan Rain) कोकणातून राज्यात पाऊस दाखल झाला आहे त्या कोकणावर वरुणराजाची कृपादृष्टी राहिलेली आहे. हंगामाच्या सुरवातीपासून कोकणासह मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात अधिकचा पाऊस झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून (Maharashtra) राज्यात मान्सून सक्रीय झाला असला तरी कोकणाला झुकते माप दिल्यानेच रत्नागिरी जिल्ह्यातील 30 अधिक धरणे ही ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर मिटला आहे पण पाणीपातळीत वाढ झाल्याने पिकांचीही चिंता मिटली आहे. (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला आहे शिवाय फळबागांनाही याचा मोठा आधार आहे.

 

राज्यात आठ दिवसांमध्ये बदलले चित्र
हंगामाच्या सुरवातीला काही मर्यादीत क्षेत्रावर बरसणाऱ्या मान्सूनने आता महाराष्ट्र व्यापला आहे. मराठवाडा, विदर्भातही पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना तर जीवदान मिळाले आहे. पण आता उत्पादनात वाढ होईल असा आशावाद आहे. निम्म्या महाराष्ट्रातून मान्सून गायब होता पण हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सून केवळ सक्रीयच झाला असे नाहीतर त्यामध्ये सातत्य देखील राहिलेले आहे.

 

सध्या पाऊस सुरुच असून पावसामध्ये सातत्य आहे. कोकणावर पावसाची कृपा असली तरी अनेक ठिकाणी अजूनही पाऊस नाही, यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या महिन्यात सरासरी एवढा पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!