ग्रामीण मातीशी नाळ जोडलेले व्यक्तीमत्व-सचिन जोशी

0 20

बालाघाटाच्या डोंगरकुशीत वसलेल्या चाटोरी सारख्या खेडे गावात जन्म झाला. वडील स्व. भगवानराव जोशी (गुरूजी) जि.प.चे शिक्षक होते. वडीलांनी आयुष्यभर गाव सोडले नाही. आई चंपाबाई (काका) या गृहणी परंतु संस्काराच ज्ञानपीठच . संस्काराचा वावर घरी लहानपणा पासूनच होता.त्यामुळे शिस्तीचे धडे मिळाले. सचिन यांच्या पत्नी कीर्ती वहिनी यांची खंबीर साथ लाभल्याने अधिकच जीवन सुखकर झाले. शालेय जीवनापासूनच मैत्रीचे धागे वीणनारा वीणकरी ठरला. शिक्षण घेत असतानाच ध्येयवेडे दोस्त एकत्र आले. त्यांनी स्वप्न पाहिले. शिक्षण घेण्यासाठी स्वतः ला झालेला त्रास अनुभवला. त्यामुळे हे आपल्या परीसरातील मुलांच्या वाटेला येऊ नये म्हणून चार मित्रानी गावातील इतर संवगड्यांना सोबत घेऊन एका संस्थेची स्थापना केली. अरूणोदय बहुद्देशीय सेवाभावी संस्था सन 2007 मध्ये स्थापना झाली. चाटोरी सारख्या खेडे गावात शैक्षणिक व सामाजिक चळवळीचे केंद्र उभा राहिले. या संस्थेव्दारा कनिष्ठ महाविद्यालयाची उभारणी केली. चाटोरी पासून 25 किमी दूर जावे लागायचे आता मुल येथेच शिक्षण घेऊ लागले. ग्रामीण भागातील मुलांना कला शाखे सोबतच विज्ञान व वाणिज्य शाखेचे शिक्षण प्राप्त होऊ लागले. पाहता पाहता बालाघाटाच्या डोंगर माथ्यावर सचिन जोशी यांनी आपल्या मित्रांच्या साहाय्यानी ज्ञानाचा मळा उभारला. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाला पाहता पाहता जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त झाला. कारण उच्चविद्याविभुषित , विद्यापीठात सुवर्ण पदक प्राप्त असलेल्या सचिन जोशी यांचे नेतृत्व प्राप्त झाले. अरूणोदय परीवाराच्या रूपाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा बी.ए. अभ्यासक्रम सुरू करून ग्रामीण भागातील मुलींच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न मिटवला. पुढे दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून सर्व सुविधायुक्त प्राथमिक शाळा सुरू केली. ग्रामीण भागालील शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला. आज ग्रामीण भागातील शेकडो मुल शासनाच्या विविध पदावर नौकरी करत आहेत.
स्वतः लाच वाचनाची आवड असल्याने ग्रामीण भागातील मुलांना वाचणाची गोडी लागावी म्हणून श्री महात्मा बसवेश्वर ग्रामीण वाचणालयाची उभारणी केली. विविध शैक्षणिक उपक्रम राबवले गेले.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच गावात विविध सामाजिक उत्सवाच्या माध्यमातून उपक्रम राबवले. गणेश उत्सव , शिवजयंती यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, शेतकरी मेळावे , महिला मेळावे, व्यसनमुक्ती कार्यक्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेऊन त्यांच्या कलागुणांना संधी दिली.
पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर मा.ना. श्रीमती फौजिया खान यांचे खाजगी स्वीय साय्यक म्हणून काम पाहिले. तेथे असाताना मा.ना. फौजिया खान यांच्या माध्यमातून परभणी जिल्हात विविध प्रकल्प आणले. पालम सारख्या तालुक्याचा विकास व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणात निधी आणला. नंतर ते ना. अर्जुनराव खोतकर यांचे स्वीय साय्यक म्हणून काम पाहत होते. या आमच्या मित्रा चा प्रवास गाव ते मंत्रालय असा झाला असला तरी एक पाय मंत्रालयात तर दुसरा गावात राहिला. डोक मंत्रालयीन कामात पण मन गावाकडंच्या लोकात असायचे. आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या टीम मध्ये काम करत असले तरी त्यांची ओढ मातीशी कायम आहे. मातीशी नातं जपणार व्यक्तीमत्व म्हणून सचिन जोशी यांची ओळख राहिलेली आहे.
ग्रामीण भागातील माणसांमध्ये रममान होणे, त्यांची प्रश्न सोडवणे , त्यांना संकटकाळात धीर देण्याचे काम नेहमी करतात. जेंव्हा जेंव्हा आम्ही मित्र एकत्र भेटतो तेंव्हा तेंव्हा एकच विचार असतो, तो म्हणचे ग्रामीण भागाचा विकास. जनसंपर्क ठेवणे, लोकांच्या गाठीभेटीत रमणारे उद्योन्मुख नेतृत्व म्हणून आम्ही सचिन जोशी यांच्याकडे पाहतो. ग्रामीण भागातील लोकांचे मन ओळखणारा , प्रश्नांची जाण असणारा, प्रश्न सोडवण्याची सचोटी असणारे विकासाभिमुख नेतृत्व आमच्या अरूणोदय परीवारातून उदयास येत आहे याचा अभिवान वाटतो.
सचिन जोशी यांची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्यांचे मित्र . लहानपणा पासून मैत्रीच रोपट लावून त्याचा वटवृक्ष करणाला अवलीया होय. जाती , धर्माच्या भिंतीच्या पलीकड जाऊन मित्रत्व जपणारा मैत्तीचा सागर होय. संकटाना तोंड देत रडत बसण्यापेक्षा लढत पुढे जाण पसंत करणार व्यक्तीमत्व. कुटुंब सांभाळत असताना मित्रांच्या प्रतिकूल परिस्थितीत खंबीरपणे पाठीशी उभ राहणारा आधारवड होय. दूरदृष्टी , संघटन कौशल्य , वाक्चातूर्य , संवेदनशील मन , संकटमोचक, धाडशी , निष्ठावान, प्रामाणिकपणा , मैत्रीचा निर्मळ झरा अशा विविध गुणानी संपन्न असलेल्या काळजातल्या मित्राला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा …!

      सुभाष ढगे चाटोरीकर
                                                       चाटोरी,ता.पालम

error: Content is protected !!