शारिरीक लक्षणांचा मानसिक आजार / सोमॅटीक सिमटम डिसऑर्डर (Somatic Symptom Disorder)

जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह निमित्त परभणी येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. सुभाष काळे यांची मानसिक आजारांवर विशेष लेख मालिका

0 84

 

 

या आजारात व्यक्तीला सहा महिने किंवा त्याहून जास्त काळ स्वत:ला एखादा मोठा आजार झाला आहे अशी लक्षणे निर्माण होतात. त्याला शरीरातील एखादे साधे आजाराचे लक्षण देखील मोठ्या आजाराच्या लक्षणा प्रमाणे वाटते.

उदा. जेवण झाल्यावर नेहमी प्रमाणे पोटावर थोडा ताण जानवला तरी सुद्धा मला पोटातून वेदना होत असून पोटाचा कॅन्सर झाला आहे काय असा तो विचार करत राहतो. अशा प्रकारे सर्वसाधारण शरीरात होणाऱ्या नेहमीच्या बदलांना तो एक विशिष्ट आजाराची लक्षणे समजून विचार करत राहतो. तो ह्या सर्व लक्षणामुळे ताणात राहतो. चिंता करत राहतो. त्यामुळे स्वत:च्या कामात त्याचे लक्ष लागत नाही.

 

 

त्याला नेहमी अशक्तपणा जाणवतो, नेहमीप्रमाणे होणाऱ्या हृदयाच्या धडधडीला तसेच नेहमीप्रमाणे असणाऱ्या श्वासाच्या गतीला देखील आजाराची लक्षणे समजते.

साधारणपणे काम केल्यानंतर किंवा गरमीमध्ये शरिराला घाम आला किंवा पोटात गॅसचा आवाज आला तरी गंभीर बिमारीचे लक्षण समजून चिंता करतो. ह्या सर्व लक्षणांच्या चिंतेमुळे तो नेहमी या ना त्या डॉक्टरांकडे जातो व तपासण्या करून घेतो. नेहमी त्याचे सर्व रिपोटर्स नार्मल असतात व डॉक्टर सुद्धा त्याना काही आजार नाही असे सांगतात.

 

 

तरी पण रुग्ण रिपोर्टवर व डॉक्टरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवत नाही मला काहीतरी मोठा आजार आहे व त्याचे निदान डॉक्टरांना होत नाही असेच तो समजत असतो. त्यामुळे अनेक डॉक्टर बदलतो व त्याच त्याच तपासण्या रिपोर्टस् पुन्हा पुन्हा करत राहतो व एखाद्या रिपोर्ट मध्ये थोडा जरी बॉर्डरलाईन बदल असेल व डॉक्टर त्यास नॉर्मल आहे असे सांगत असतील तरीपण त्या रिपोर्ट बद्दल रुग्ण खूप विचार करत राहतो.

जसा जसा वेळ निघून जातो. वर्ष दोन वर्षे होतात तेव्हा माझा हा गंभीर आजार ठीक होणार नाही असेच त्याला वाटते. त्यामुळे त्याच्यामध्ये नैराश्य व चिंता ह्या आजारांचिही लक्षणे दिसून येतात.

 

 

बऱ्याच वेळा लक्षणे अधून मधून बदलात. सारखे राहत नाहीत. काही दिवस डोके जड पडते तर काही दिवस पोट गच्च वाटते तर काही दिवस शरीर आखडल्यासारखे वाटते. प्रत्येक लक्षणासाठी त्या त्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडून तपासण्याकरून घेतल्या जातात व सर्व तपासण्या नॉर्मल असतात व डॉक्टरांचे मत देखील असत की काही आजार नाही.

असे व्यक्ती घरातील जिम्मेदारी व रोजचे काम व्यवस्थित करत नाहीत. नेहमी आजाराच्या विचारात राहून चिंताग्रस्त राहतात. कारणे

१) बऱ्याच जनांना वाईट प्रसंगातून निर्माण झालेल्या भावना राग अपराधीपणाची भावना मोकळेपणाने बोलून दाखवता येत नाहीत तेव्हा त्या भावना मनामध्ये सुप्त अवस्थेत राहून असे काही शारीरिक लक्षणे निर्माण करतात.

२) हा रोग अशा लोकांना होतो जे शरीरामध्ये छोटे – मोठे फिजॉलॉजीकल घडणाऱ्या बदलांना आजाराच्या दृष्टीकोनातूनपाहातात व बरदास्त करू शकत नाहीत.

३) काही लोकांना नकळत आजारपणाचा रोल केल्यास सहानुभूती मिळते. ते जाणून बुजून करत नाहीत नकळत त्यांच्याकडू होते. उपचार

१) रुग्णास ताणतणाव कमी करण्याच्या पद्धती शिकवल्या जातात. २) त्यांच्या मनातील चिंता कमी करण्यासाठी औषधोपचार केला जातो. तसेच त्यांना नैराश्य किंवा चिंतारोग असेल त्यासाठी औषधोपचार दिला जातो.

३) त्यांचे लक्षणे पूर्ण ऐकून घेऊन रिपोर्ट नॉर्मल असताना देखील ही लक्षणे का निर्माण होतात. हे समजले जाते.

४) ग्रुप सायकोथेरपी; बिहेवियर थेरपी; कॉगनेटीव्ह थेरपी याचाही वापर केल्या जातो.

एकदा एक माजी आमदार आपल्या भाच्याला घेऊन आले होते.

भाच्याचे नाव होते प्रवीण.

प्रवीणने इंजिनियरिंग बी. इ. केले होते काही दिवस नोकरी पण केली प्रवीनची थोडी पाठ दुखत होती. काही दिवस अस्थिरोग तज्ञ डॉक्टराकडून तपास करून घेतले. पण त्याला फारसा फरक जाणवला नाही. तसेच दोन महिने निघून गेले पण पाठ दुखतच होती. त्यामुळे प्रवीणने नोकरी सोडली. सध्या एक वर्ष होत आहे. प्रवीण घरी आहे. त्याचे मामा माजी आमदार साहेब सांगत होते. डॉक्टर, हा घरी बसून राहतो जास्त वेळ बेडवरच राहतो. नेहमी त्याचे काहीना काहीतरी दुखत राहते. सुरूवात पाठ दुखीपासून झाली. त्यासाठी मी त्याला पुण्याला नेऊन स्पायनल सर्जनला देखील नाही. काही दिवस पोटाचा त्रास होतो. काही दिवस डोकेच जड पडते तरी दाखवून संपूर्ण तपासण्या करून घेतल्या. काहीही दोष सापडला कधी फक्त अशक्तपणा असतो तर कधी शरीर आखडल्या सारखे होते. कधीच फ्रेश नसतो.

 

 

सारखा मोबाईलमध्ये गुगलवर आयुर्वेदीक औषधी, प्रोटीन पावडर शोधून मागवत राहतो. त्याची आईपण त्याला फार मोठा आजार आहे असे समजून चांगले खायला घालते. सोनोग्राफी, एक्स रे, रक्ताच्या तपासण्या सि. टी. स्कॅन, एम.आर.आय. करून तीन मोठ्या फायईस झाल्या आहेत.

सहा महिन्यापूर्वीनंतर मला एच. आय. व्ही. तर झाला नाही ना म्हणून सारख्या रक्ताच्या चाचण्या करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच पॅथलॉजी लॅब मध्ये जाऊन तपासणीसाठी रक्त देत असे. तेव्हा एका पॅथॉलॉजी डॉक्टरांनी मला फोन करून सांगितले. याला एच.आय.व्ही. वगैरे काही नाही. याला सायकॅस्ट्रीस्टला दाखवा आणि मी तुमची माहिती घेतली तेव्हा कळले की असे बरेच पेशन्ट तुमच्याकडे ठिक झाले आहेत.

 

 

आमची काही मोठी अपेक्षा नाही ह्यानी फक्त रोज शेतात एखादी चक्कर मारून मजूरांना काम सांगावे व घराचा व्यवहारात पहावा कारण हा आईवडीलांना एकच व वडील सुद्धा महातारे झाले आहेत.

मी प्रवीण बरोबर बोललो. तो म्हणत होता. डॉक्टर, मामाचे म्हणणे आहे तुला काही झाल नाही. तूझा भ्रम आहे की तू आजारी आहेस म्हणून. डॉक्टर माझ्या हातावरील नसा पाहा कशा मोठ्या दिसतात. इतरांच्या अशा नसतात. मला लघवी सुद्धा कधी कधी गरम होते. मी काही जाणून बुजून आजारपणाचा नाटक करत नाही. मला थोडेही चालल की थकवा येतो. सर्वांसारखी एनर्जी माझ्यात नाही.

मी त्याचे सर्व रिपोर्ट पाहीले व सर्व डॉक्टरांचे ओपानियन पाहिले. त्याची मानसिक स्थिती जाणून घेतली व औषधोपचार सुरू केला व रिलॅक्शन थेरपी शिकवली. एक दोन महिन्यांनी त्याचे इतर डॉक्टरकडे जाणे बंद झालो. तो शेतात पण कधी कधी जाऊ लागला. सहा महिन्यात शेतातील कामाची पाहणी करणे; मजुरांना काम सांगणे करू लागला. आता गुगलवर पाहून आयुर्वेदीक औषधी मागवने पण बंद झाले.

 

 

हायपोकॉड्रीयसिस HYPOCHONDRIASIS
ह्या मानसिक आजारात रुग्ण सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ स्वतःच्या शारीरिक लक्षणांचे चुकीचे अर्थ काढून आपणास काहीतरी मोठा आजार झाला आहे असी समजूत करून घेऊन चिंता करतो. त्यामुळे आपल्या रोजच्या दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष झालेले असते. किंवा ह्या आजारामुळे मी काम करू शकत नाही असे वाटते.

 

 

कधी एक लक्षण तर कधी अनेक लक्षणे असतात. कधी कधी लक्षणे बदलतात. या लक्षणांसोबतच काहीजनांना निराशेचे किंवा चिंतेचे पण लक्षणे असतात. ह्या आजरात बरेच मानसशास्त्रीय कारणे आहेत. ह्या आजारात औषधोपचारां सोबतच समुपदेशन सुद्धा उपयोगी पडते.ह्या आजारात रुग्ण वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाऊन बरेच तपासणी रिपोर्ट करून फाईल्स जमा करतो. रिपोर्ट नॉरमल असला तरी रुग्णाचे समाधान होत नाही.

प्रशांत वय ३२ वर्ष. बिफार्म झाल्यानंतर एक फारमॅसिटीकल कंपनीमध्ये मेडीकल रिप्रेझेंटेटीव्हचा जॉब करत असतो. त्याला रोज मोटारसायकलवर डॉक्टरांना भेटावे लागे. तिथे डॉक्टरांच्या भेटीसाठी एक एक दोन-दोन तास वेटींग मध्ये बसावे लागे आणि दर महिन्याचे कंपनीचे टारगेट राही कि एवढा सेल झाला पहिजे.

 

 

या सर्व गोष्टींचा तो खूप ताण घ्यायचा. या सर्व ताणतणावामध्ये दोनतीन वर्ष निघून गेले. नंतर त्याची पाठ दुखू लागली. त्यामुळे तो डॉक्टरांच्या कॉलवरून घरी आला की आराम करायचा. घरातील काही कामे सांगितली की म्हणयचा मी खूप दमलो आहे मला ही कामे सांगू नका.

एकदा त्याला संडास लागली. पोट दुखूलागले. डॉक्टरांना दाखवले. औषधोपचार घेतला. संडास कमी झाली पण प्रशांतचे समाधान झाले नाही. त्याला पोटात गॅसेस होत आहेत असे जाणवले. त्या दिवसापासून त्याचे जेवण कमी झाले. आणि त्याने कंपणीत सुट्टीचा अर्ज करून आराम करणे पसंद केले.

 

 

नंतर त्याच्या लक्षणांमध्ये बदल होऊन कधी त्याला दिवसांतून दोन वेळेस किंवा तीन वेळेस संडासला जावे लागे. पण संडास काही होत नसे. आणि पोटात गॅस झाल्यासारखे होत असे. त्याच्या सोबत पाठ पण दुखू लागली. हात पाय थंड पडत असत. अशक्तपणा येत असे.

तो अधूनमधून स्वत:ची नाडी चेक करत असे. तो ज्या डॉक्टरांकडे उपचार घेत होता त्या डॉक्टरांनी त्याला सध्या काही आजार नाही. तू डयुटी जाईन करू शकतोस अते सांगितले. लक्षणे कमी होत नाहीत म्हणून गॅस्ट्रोइंटरॉलॉजिस्ट कडे तो गेला. डॉक्टर काही मेडीशीन लिहून देत होते तेव्हा त्याने डॉक्टरांना काही तपासण्या करण्याची विनंती केली. मग डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचे सांगितले. तो रिपोर्ट नॉरमल आला. तेव्हा डॉक्टर म्हणाले काळजी करू नकासे. काही प्रॉब्लेम नाही. प्रशांतचे काही समाधान झाले नाही.

 

 

कंपनीकडून प्रशांतला जॉईन होण्यासाठी पत्र आले. माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे मी जॉईन होऊ शकत नाही असे त्याने सांगितले. तेव्हा कंपनीने मेडीकल सर्टीफिकेट मागितले. डॉक्टरांनी त्याला काहीही प्रॉब्लेम नसल्यामुळे सर्टीफिकेट दिले नाही. शेवटी कंपनीने त्याला काढून टाकले.

मग आईवडिलांनी त्याला समजावले की तुझा रिपोर्ट नॉरमल आहे. तू काळजी करू नकोस. जसे होईल तसे काम कर. मात्र प्रशांत नी मला काम करणे शक्य नाही असे सांगितले.

 

 

तो सध्या मोबाईलवर बऱ्याच आजरांची लक्षणे शोधून एखादा स्वत:ला झाला असावा असा अंदाज व्यक्त करतो आणि नवीन डॉक्टर शोधून त्यांना दाखवतो. प्रत्येक डॉक्टरांकडे गेल्यानंतर रिपोर्ट करण्याची विनंती करतो. त्याने एक्स-रे, सोनोग्राफी, इंडोस्कोपी, कॉलोनोस्कोपी, लघवीच्या तपासण्या, संडासची तपासणी; रक्ताची तपासणी अशी अनेक वेळेस केली. पण त्याला फारसा फरक काही पडत नव्हता. असेच दहा महिने निघून गेले..

शेवटी एका गॅस्ट्रोइंटरॉलॉजीस्तटने त्याच्या आईवडिलांना सोबत बोलावले आणि सर्वांना सांगितले की कधी कधी शारीरिक लक्षणे असून देखील शारीरिक आजार नसून तो मानसिक आजार असतो. त्यामुळे प्रशांतला एखाद्या मनोविकारतज्ञाकडे दाखवणे आवश्यक आहे.

 

 

तेव्हा प्रशांत म्हणाला की मला काही मानसिक लक्षणे नाहीत. डॉक्टरांनी सांगितले की तरीही तू मनोविकार तज्ञांना भेट. तेव्हा प्रशांत आईवडिलांसोबत मनोविकारतज्ञांना भेटला.

त्यांनी सर्व रिपोर्ट पाहून त्याला तुला हायपोकन्ड्रीयासिस आहे असे सांगून त्याला समुपदेशन केले व काही औषधोपचार लिहून दिला.

आता सध्या दोन तीन महिन्यात प्रशांतला ५०% बरे वाटू लागले. त्यांने स्वतःचे मेडीकल दुकान सुरू केले आणि रेग्युलर दर महिन्याला मनोविकार तज्ञांनाभेटून औषधोपचार घेत असे.

 

डॉ. सुभाष काळे, मानसोपचार तज्ञ
मन शांती हॉस्पिटल, पाथरी रोड परभणी

error: Content is protected !!