चिंतारोग / अॅन्झायटी डिसऑर्डर Anxiety Disorder

जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह निमित्त परभणी येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. सुभाष काळे यांची मानसिक आजारांवर विशेष लेख मालिका

0 148

 

अन्झाइटी : म्हणजे एखाद्या गोष्टीची जरूरी पेक्षा जास्त भीती वाटणे किंवा काळजी करणे.

प्रकार :

१. PANICATTACK (पॅनिक अॅटॅक)

२. AGORAPHOBIA (अँगोरोफोबिया)
३. SPECIFIC PHOBIA (स्पेसिफिक फोबिया)

४. SOCIAL PHOBIA (सोशल फोबिया)

५. OBSESSIVE COMPULSIVE DISORDER (ऑबसेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर)

६. POSTTRAUMATIC STRESS DISORDER (पोस्ट ट्रोमॅटीक स्ट्रेस डिऑर्डर)

७. ACUTE STRESS DISORDER (अॅक्यूट स्ट्रेस डिसॉर्डर)

८. GENERALIZED ANXIETY DISORDER

(जनरलाईझड अॅन्झाइटी डिसऑर्डर)

PANICATTACK (पॅनिक अॅटॅक)

वारंवार, अचानकपणे भीति वाटणे; अस्वस्थ वाटणे व दहा मिनिटात हृदयाची धडधड वाढून तळहात, तळपायास घाम येणे; हात- पाय थरथरणे; गुदमरल्या सारखे होणे; आपणास श्वास घेणे अशक्य होते. कि काय असे वाटणे; पोटात ओढल्या सारखे होणे; छाती दबल्यासारखी होऊन वेदना होणे; डोके हलके होऊन चक्कर आल्याप्रमाणे होणे; आता मरण येते की काय असे वाटणे.

 

वर नमूद केलेल्या लक्षणांपैकी चार किंवा अधिक लक्षणे

महिन्यातून एकदा किंवा वारंवार दिसणे. नेहमी आपणास असा अॅटॅक येतो की काय याची भीती वाटणे. जेव्हा डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केल्या जाते तेव्हा कोणताही शारीरिक आजार नसतो. तसेच एखाद्या व्यसनामुळे देखील असे झालेले नसते.

शंकर ४५ वर्षाचे एका ऑफीसमध्ये क्लर्कचे काम करतात. मार्च एन्डींग जवळ आल्यामुळे त्यांना कामाचा खूप व्याप होता. त्यातच त्यांचा नवीन असलेला बॉस नेहमीच त्यांच्या कामाच्या चूका काढून दाब देत असे. त्यामुळे ते सध्या नेहमी टेंशन मध्येच असत.

 

 

अशातच एकदा सकाळी उठून चहा पितांना त्यांना घबराहट जाणवली व छातीत धडधड होत होते. तळहात, तळपायाला घाम आला. हात थरथरत होते. छातीची धडकन आणखीनच वाढली. श्वाच्छोश्वास जोरात वाढत होता. तेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नीस आवाज दिला व त्यांची ही परिस्थिती पाहून ती पण घाबरली. तेव्हा पत्नी म्हणाली तुम्हाला काय होत ? तर शंकरने सोफ्यावर अंग टकाले व म्हणाला मला श्वास घेण्यास त्रास होतो व छातीत दाबल्यासारखे होऊन धडधड होते. मला हृदयरोगाचा तीव्र झटका येत आहे. मला हॉस्पीटल मध्ये घेऊन जा.

 

 

शंकरची हृदयरोगतज्ञांनी तपासणी केली. छातीचा इ.सी.जी. काढला. स्ट्रेस टेस्ट घेतली व सांगितले की सध्या हृदयाचा कोणताही आजार नाही. यांना मनोविकारतज्ञाला दाखवावे लागेल. तेव्हा शंकर व त्याची पत्नी डॉक्टरांना म्हणाला की, “ह्यांना कोणतीच मानक बिमारी नाही तेव्हा मनोविकारतज्ञाला दाखवण्याची काय गरज?” तेव्हा डॉक्टर त्यांना म्हणाले,

” जर हृदयरोग नसून टेन्शन आले होते तेव्हा पुढे हे वारंवार होण्याची शक्यता असते म्हणून मनोविकारतज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तेव्हा शंकर मनोविकारतज्ञाकडे गेला व मनोविकारतज्ञाने त्याचा जेव्हा पूर्वीचा इतिहास जाणून घेतला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की शंकरला त्यापूर्वी देखील अशा प्रकारचे अॅटक एक दोन वेळेस येऊन गेले होते पण त्यानेसाध्या डॉक्टरांना दाखवल्यानंतर राहिले. तेव्हा मनोविकारतज्ञाने शंकरला सांगितले की, “याला पॅनिक अॅटक असे म्हणतात व हे नियमित उपचार केल्याने असा आजार बरा होतो. ”

 

 

AGORAPHOBIA (ॲगोरोफोबिया)

एखाद्या जागेबद्दल किंवा घटणेबद्दल भीती वाटणे व आपली तिथून सुटका होणार नाही किंवा आपणास काही मदत मिळणार नाही असे वाटणे उदा. एकटे घराबाहेर जाण्यास भीती वाटणे. मला जर रस्त्यामध्ये दमकोंडल्यासारखे किंवा घबराहट झाली तर माझे काय होईल याची भीती वाटणे.

• गर्दीमध्ये जाण्याची भीती.

• एखाद्या लाईनमध्ये उभे राहण्याची भीती.

• एखाद्या पुलावरून जाण्याची भीती. • बस, ट्रेन प्रवास करण्याची भीती.

वरील भीतीमुळे अशा आजाराची माणसे एकटे कुठे जात नाहीत. प्रवास करण्याचे टाळतात. पण जर आपल्या जवळचा व्यक्ती सोबत असेल तर बरे वाटते. तीव्र झटका येत आहे. मला हॉस्पीटल मध्ये घेऊन जा.

 

 

शंकरची हृदयरोगतज्ञांनी तपासणी केली. छातीचा इ.सी.जी. काढला. स्ट्रेस टेस्ट घेतली व सांगितले की सध्या हृदयाचा कोणताही आजार नाही. यांना मनोविकारतज्ञाला दाखवावे लागेल. तेव्हा शंकर व त्याची पत्नी डॉक्टरांना म्हणाला की, “ह्यांना कोणतीच मानक बिमारी नाही तेव्हा मनोविकारतज्ञाला दाखवण्याची काय गरज?” तेव्हा डॉक्टर त्यांना म्हणाले, ” जर हृदयरोग नसून टेन्शन आले होते तेव्हा पुढे हे वारंवार होण्याची शक्यता असते म्हणून मनोविकारतज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

 

तेव्हा शंकर मनोविकारतज्ञाकडे गेला व मनोविकारतज्ञाने त्याचा जेव्हा पूर्वीचा इतिहास जाणून घेतला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की शंकरला त्यापूर्वी देखील अशा प्रकारचे अॅटक एक दोन वेळेस येऊन गेले होते पण त्यानेसाध्या डॉक्टरांना दाखवल्यानंतर राहिले. तेव्हा मनोविकारतज्ञाने शंकरला सांगितले की, “याला पॅनिक अॅटक असे म्हणतात व हे नियमित उपचार केल्याने असा आजार बरा होतो. ”

 

AGORAPHOBIA (ॲगोरोफोबिया)

एखाद्या जागेबद्दल किंवा घटणेबद्दल भीती वाटणे व आपली तिथून सुटका होणार नाही किंवा आपणास काही मदत मिळणार नाही असे वाटणे उदा. एकटे घराबाहेर जाण्यास भीती वाटणे. मला जर रस्त्यामध्ये दमकोंडल्यासारखे किंवा घबराहट झाली तर माझे काय होईल याची भीती वाटणे.

• गर्दीमध्ये जाण्याची भीती.

• एखाद्या लाईनमध्ये उभे राहण्याची भीती.

• एखाद्या पुलावरून जाण्याची भीती. • बस, ट्रेन प्रवास करण्याची भीती.

वरील भीतीमुळे अशा आजाराची माणसे एकटे कुठे जात नाहीत. प्रवास करण्याचे टाळतात. पण जर आपल्या जवळचा व्यक्ती सोबत असेल तर बरे वाटते.
एकदा मी बाह्य रुग्णालयात रुग्ण तपासत असताना एक महिला आली व म्हणाली, “डॉक्टर, मी तुम्हाला काही माहिती विचारण्यासाठी आली आहे.’

 

जेव्हा मी माझे रुग्ण तपासणे बंद करून त्यांना बोललो तेव्हा त्या म्हणाल्या, “माझे पती किराणा दुकान चालवतात. ते दुकान आमच्या घरीच समोच्या शेटरमध्ये आहे. पण त्यांना कुठ बाहेर जायचे म्हटल की ते टाळतात. त्यांना गर्दीमध्ये गुदमरल्यासारखे होते. घाम येतो. म्हणून कुठे यात्रेला किंवा देवाच्या दर्शनाला मंदिरात येत नाहीत आणि मार्केटमध्ये पण येत नाहीत. दुकानासाठी लागणारे सामान त्यांना मीच आणून देते. माझ्या मैत्रिणीने तुम्हाला भेटण्यासाठी सांगितले. कारण तिच्या एका नातेवाईका सर्वसाधारण असेच होत होते. तो आता तुमचा उपचार घेतो आणि सर्व कामे करतो. ”

 

 

तेव्हा मी त्या महिलेस त्यांच्या पतीला माझ्याकडे घेऊन येण्यास सांगितले. दुसरे दिवसी जेव्हा ते आले तेव्हा सांगत होते की, “डॉक्टर, मला एकट्याला कुठे जाऊ नये असे वाटते कारण मला वाटते की जर मला रस्त्यात किंवा इतर ठिकारी घबराहट झाली तर मी एकटा काय करेल ? आणि कुणी सोबत असताना देखील गर्दीच्या ठिकाणी दम कोंडल्यासारखे होते. बैचनी वाढते. मोकळा श्वास घेता येत नाही. त्यामुळेकुठे जात नाही. डॉक्टर, एकदा मी आपल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी सहकुटूंब गेलो होतो. जाताना कसा तरी गेलो पण नंतर मंदिर एकदम छोटे व खोल आणि रस्ता अरूंद तेव्हा आत गेल्यानंतर येणाऱ्या गर्दी पाहून माझी सुटका होणार नाही असे मला जाणवले व एकदम घाम आला व घबराहट, बेचैनी सुरू झाली व मला असे वाटत होते की मी आता मरणार आहे… डॉक्टर, ते आठवले तरी सुधा मला आज त्रास होतो.’

 

 

तेव्हा मी त्यांची शारीरिक तपासणी केली व त्यांनी सोबत आणलेली फाईल ज्यामध्ये ई.सी.जी. व काही रक्ताचे रिपोर्ट वगेरे अनेक वेळी केले होते व ते सर्व नॉर्मल होते. मी त्यांना विश्वासात घेतले आणि म्हणालो, “तुम्ही जरी अशा ठिकाणी जात नसाल तरीही इतर लोक तिथे जातात व त्यांना काही होत नाही. तुमची शारीरिक कंडीशन चांगली आहे. फक्त अशा ठिकाणी जाण्याचे झाल्यास तुमच्या मेंदूमध्ये भीतीची सिस्टीम जास्त काम करण्यास सुरूवात करते व मग तशी लक्षणे शरीरामध्ये जाणवतात. जसे धडधड होणे; हातपाय थरथर कापणे; घाम येणे व मग तुम्ही आणखीनच घाबरता ‘व तुम्हाला माझ्या सोबत काही तरी वाईट घडणार आहे असे वाटते. या सर्व प्रकाराला अगरोफोबीया असे म्हणतात. हा एक साधा मानसिक आजार आहे. उपचाराने व दिवसेंदिवस थोडे थोडे करून अशा प्रसंगांना सामोरे जाऊन ही भीती नाहीशी होते”

 

 

मग त्यांनी उपचार सुरू केले व एक दोन भेटी नंतर जेव्हा त्यांना थोडा विश्वास आला तेव्हा घरापासून काही अंतरावर थोडी गर्दी असलेल्या ठिकाणी पत्नी सोबत जाण्यास सांगितले.

नंतर हळूहळू मार्केटमध्ये जाण्यास सांगितले. पण ते म्हणाले मार्केट मध्ये गेल्यावर पुन्हा असेच झाले तर काय करावे? तेव्हा मी त्यांना एक गोळी दिली व सांगितले की तिथे असा प्रसंग येईल तिथे ही गोळी घेऊन १०-१५ मिनटे थांबा तुम्हाला बरे वाटेल. अशा प्रकारे ते आता त्यांची सर्व कामे एकटे करतात.

 

SPECIFIC PHOBIA (स्पेसिफिक फोबीया)

एखाद्या विशिष्ट गोष्टीची अतिशय व नेहमी भीती वाटणे.

उदा. विमानात बसून उडण्याची भीती,

उंच जागेवरील भीती

• एखाद्या केसाळ प्राणी उदा. कुत्रा, अस्वल याची भीती • एखादा किडा उदा. झुरूळ किंवा पाल याची भिती

इंजेक्शन घेण्याची भीती

• रक्त पाहण्याची भीती

या रोगाची माणसे वरील गोष्टी टाळतात व जर त्यांना अशा गोष्टींना सामोरे जाण्याची गरज पडली तर त्यांची घबराहट, धडधड होणे; भीती वाटते. मी मरतो की काय असे वाटते. गुदमरल्यासारखे वाटते.

रवि १८ वर्षांचा मुलगा इंजेक्शनला खूप घाबरत असे. स्वतःला इंजेक्शन घेणे तर सोडाच पण इतरांना इंजेक्शन देताना पण तो पाहू शकत नसे. काही कारणामुळे त्याला जर हॉस्पीटलमध्ये नेले तर त्याची आई प्रथम डॉक्टरांना सांगत असे की याला इंजेक्शन देऊ नका. त्याला चक्कर येते.

 

 

मग त्याने एकदा स्वतः ह्या मानसिक आजारा बद्दल वाचले व त्याला समजले की मला इंजेक्शन बद्दल फोबीया आहे. याला स्पेशिफिक फोबीया असे म्हणतात. मग तो मनोविकारतज्ञाकडे गेला व मला ह्यातून बाहेर पडायचे आहे असे म्हणाला. तेव्हा मनोविकार तज्ञाने त्याला इंजेक्शन काय आहे; कसे देतात याबद्दल सविस्तर सांगितले व नंतर त्याला सांगितले की तू खालील प्रमाणे स्टेप्स करत जा म्हणजे तुझी भीती हळूहळू कमी होईल.

पहिली स्टेप : इंजेक्शनची चित्रे पहाने म्हणजे सिरिंज, निडल इ. व ती चित्रे स्वत: काढणे.

दुसरी स्टेप : इंजेक्शन म्हणजे सिरींज व निडल प्रत्यक्ष दुरून पाहाणे

तिसरी स्टेप : सिरिंज व निडल हातात घेऊन पाहाणे.

चौथी स्टेप सिरिंजमध्ये निडलने पाणी भरून घेणे व इंजेक्शन कापडी बाहुल्याला देणे.

पाचवी स्टेप : दुसऱ्याला इंजेक्शन देताना कृती पाहणे.

सहावी स्टेप : स्वत: डॉक्टांकडून इंजेक्शन घेणे.

 

त्या स्टेप करताना पहिल्या स्टेपचा सराव होऊन कमी झाली तरच पुढच्या स्टपेकडे जाणे व प्रत्येक स्टेपस मध्ये सायन्स त्यातून समजावून घेणे व भावनिक न होणे आणि भीती व घबराहट कमी होण्यासाठी डॉक्टरांनी काही मेडीसिन रोज घेण्यासाठी दिले. भीती

अशा पद्धतिने रवीने तीन महीने सराव केला व नंतर तो यशस्वी झाला आता त्याच्या मनातून इंजेक्शन बद्दलची भीती नाहीसी झाली आहे.

 

SOCIAL PHOBIA (सोशल फोबिया)

एखाद्या सामाजिक ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये अनोळखी लोकांमध्ये मिसळणे; त्यांच्याबरोबर बोलणे याबद्दल अतिशय नेहमी भीती वाटणे, अशा आजारांच्या व्यक्ती नवीन लोकांत मिसळणे: ऐता कार्यक्रमात भाग घेणे, चार माणसांसमोर बोलणे; भाषण करणे राळतात व जर समोर जाण्याची आवश्यकता असेल तर त्यांना भीती वाटते.

किरणचे २६ वर्ष वय. एकदा वडील आजारी असल्यामुळे त्याला एका नातेवाईकाच्या लग्नास जाण्यास सांगितले तेव्हा प्रथम तो जाण्यास तयारच नव्हता. तुला जाणे आवश्यक आहे. जायलाच पाहिजे असे जेव्हा सांगितले तेव्हा तो कसातरी गेला. लग्न समारंभात जाताना लोक मला काय म्हणतील? माझा ड्रेस बरोबर आहे काय? मला लोकांसमोर बोलता येईल का? अशा अनेक प्रश्नांबद्दल विचार करत होता. पण रण होईपर्यंत त्याला ओळखीचे कोणी भेटले नाही म्हणून जरा बरे वाटले. लभ लागल्यानंतर जेव्हा पाहुण्यांशी भेटण्याचा प्रसंग आला तेव्हा किरणच्या छातीत धडधड सुरू झाली. मी काय बोलू? मला नीट बोलता येईल का? लोकांसमोर माझा इन्सल्ट तर होणार नाही ना ? मग त्याला घाम आला. हात पाय थरथरत होते. शेवटी तो तिथून भेट वस्तू न देताच व पाहुण्यांना न भेटताच निघून आला.

 

 

घरी आल्यानंतर आईवडिलांनी जेव्हा त्याचा अवस्था ऐकून घेतली तेव्हा आपण तुला मनोविकारतज्ञाला दाखवून साला घेऊ असे ठरले. मनोविकारतज्ञाकडे गेल्यानंतर त्याच्या आईने प्रथम घडलेला सर्व प्रसंग • डॉक्टरांना सांगितला. मग डॉक्टरांनी किरणसी बोलण्यास सुरूवात केल्सी. तेव्हा किरणने सांगितले की डॉक्टर साहेब मला हा प्रॉब्लेम कॉलेज मध्ये होतो तेव्हा पासून आहे. चार चौघांसमोर बोतलाना मी नव्र्व्हस व भय असतो. घाबरतो. मला वाटते की ह्यांच्या समोर बोलताना काही असे सर घडणार नाही ज्यामुळे माझा इन्सल्ट होईल. मला बोलताना असे वाटते की माझे वाक्य चुकत आहे किंवा चुकेल. तेव्हा मी जास्त बोलत नाही किंवा संभाषण लवकर संपून तिथून निघतो. म्हणून मी पब्लिक प्लेसेस, कार्यक्रम टाळतो. जास्तीत जास्त एकटा राहतो किंवा माझे जे तीन मित्र आहेत. फक्त त्यांच्याशी बोलतो. म्हणून मी काम देखील असे घेतले आहे की कम्प्युटरवर बसून अकाऊंट राईटींग करणे. म्हणजे जास्त लोकांचा संबंध येत नाही.

मग डॉक्टरांनी त्याला काही गोष्टींची जाणीव करून दिली व औषधोपचार सुरू केला व मग प्रत्येक व्हिजीटला डॉक्टरांनी त्याचा आत्मविश्वास वाढल्याचे दाखवून दिले.

 

 

पोस्ट ट्रोमॅटीक स्ट्रेस डिसऑर्डर (POSTTRAUMATIC STRESS DISORDER)

स्वतःच्या किंवा इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या एखाद्या धक्कादायक परस्थितीला सामोरे गेलेल्या व्यक्तीला पोस्ट ट्रोमॅटीक स्ट्रेस डिसऑर्डर होऊ शकते. या प्रसंगाला सामोरे जाताना रुग्णाने खूप भीती अनुभवलेली असते.

या आजारात अशा रुग्णाला सतत त्या प्रसंगाचे विचार येतात. त्या प्रसंगाची चित्रे समोर दिसतात. त्या प्रसंगाची स्वप्ने पडतात. त्या प्रसंगांची आठवण करून देणाऱ्या वस्तू किंवा गोष्टी बघितल्यावर खूप त्रास होतो. धडधड होते घबराहट होते.

त्यामुळे रुग्ण त्या प्रसंगाबद्दल बोलण्याचे टाळतो. त्या प्रसंगाशी संबंधीत जागा, व्यक्ती, वस्तू टाळतो. ह्या सर्व त्रासामुळे रुग्णास झोप येत नाही. जेवन जात नाही. मनाची एकाग्रता होत नाही. छोट्याछोट्या गोष्टींचा राग येतो.

• युद्धाच्या परिस्थितीत काही लोकांमध्ये असा मानसिक आजार होतो. * शारीरिक टॉर्चर किंवा बलात्कार ह्या सारख्या घटणेनंतर देखील काही भूकंप किंवा सुनामी मध्ये काही लोकांमध्ये हा मानसिक आजार होतो. जनांमध्ये असा आजार होतो.

* दंगे किंवा अॅक्सीडन्ट अनुभवल्यानंतर देखील असा आजार होऊ शकतो.

* लहान मुलांमध्ये (सहा वर्षाचे किंवा त्यापेक्षा मोठे) सुद्धा हा आजार असू शकतो.

एका घटनेमध्ये अनेक लोक असतात तेव्हा सर्वांमध्येच हे लक्षण येत नसून काही जनांमध्येच ही लक्षणे जाणवतात.

उपचार : अशा व्यक्तीला त्या विशिष्ट घटनेची आठवण न होऊ देता औषधोपचाराने व समुपदेशाने ह्या आजाराची लक्षणे कमी करता येतात.

सूरज तेवीस वर्षाचा. एकदा सुट्टीमध्ये एस. टी. ने शहरातून गावाकडे येत होता. दुपारी तीनची वेळ असेल. अचानक एस.टी.ची. जोरात वित्रित्र हालचाल होत होती. असे वाटत होते की ड्रायव्हरचा एस. टी. वरील ताबा सुटला आहे. सूरज ड्रायव्हरच्या मागच्या सिटवर बसल्यामुळे त्याला एस.टी.त काय चालले आहे हे सर्व दिसत होते. जोरात आवाज येत होता. लोक इकडे तिकडे पडत होते, त्यांच्या अंगावर वरील बॅगा व इतर सामान पडत होते. कुणी किंचाळत होते. असे चारपाच मिनिटे झाल्यानंतर एस. टी. रोडच्या खाली एका शेतात थांबली.

 

सर्व प्रवाशी एस.टी.तून खाली उतरले. कुणाला डोक्याला तर कुणाला हाता-पायाला ; कुणाला खांद्याला मार लागला होता. एका म्हाताऱ्या आजी तर बेहोश झाल्या होत्या. बऱ्याच प्रवाशांना जखमा होऊन रक्तस्त्राव होत होता.

सर्वजन एकमेकांची मदत करत होते. ड्रायव्हरच्या हाताला, कोपराला मार लागला होता. ड्रायव्हर सांगत होता की, समोरून एक लग्नाच्या कार्यक्रमाची जीप एकदम रोड सोडून समोर आली. तिला वाचवण्यासाठी मी एस.टी. रोड सोडून खाली घेतली.

 

 

पाहतो तर काय एस.टी.च्या समोर आलेली जीप काही अंतरावर झाडावर आपटली होती व जवळ गेल्यावर कळाले की, जीपमधील ड्रायव्हर व एक व्यक्ती जागीच मृत्यू पावला आहे व इतर बरेच जखमी झाले आहेत. नंतर रस्त्यावरून जाणाऱ्या एस.टी. बसेस थांबवून जे लोक जाण्यासारखे आहेत त्यांना पाठवले. काहजन तर पुन्हा वाहणात बसायचे म्हटले की घाबरत होते.

कुणी तरी फोन करून अॅम्बुलन्स बोलवली. अशा प्रकारे सर्व जखमींना व मृत व्यक्तींना सुद्धा हॉस्पीटल मध्ये घेऊन गेले. मी आमच्या एस.टी. कडे पाहतो तर थोड्या अंतरावर एक पूल होता व मोठे नदीचे पात्र होते. विचार केला की ड्रायव्हरला थोडा कन्ट्रोल नसता झाला तर एस.टी. नदीच्या पात्रात जाऊन आणखीच मोठी हानी झाली असती.

 

 

सुरज दुसऱ्या एस.टी. ने. घरी पोहोचला. त्याला पायाला थोडे खरचटले होते. घरी पोहोचल्यानंतर आईने त्याला पाणी दिले. चहा दिला व सूरजचा चेहरा पाहून म्हणत होती, “तू कसा घाबरल्या सारखा वाटतोस.. काय झाले ?” तेव्हा सूरजला कळत नव्हते काय होत आहे. तो विचार करत होता. एका तासापूर्वी आपल्या सोबत जे घडले ते किती महाभयंकर होते. आपला मृत्यू झाला असता. आता आपण चहा पितो आहोत. त्याला काहीतरी वेगळे घडत आहे असे भास होत होते. त्याने आईला म्हटले की, “मी थोडा आराम करतो. कसे तरी होत आहे”. नंतर सूरजला झोप देखील येत नव्हती. पुन्हा पुन्हा तेच एस. टी. मधील लोकांचे चिरकणे, ओरडणे व एस. टी.ची होणारी हालचाल दिसत होती.

खूप बैचेनी मध्ये आहे म्हणून आईने काय झाले ते विचारले. तेव्हा त्याने थोडक्यात अॅक्सीडेन्ट बद्दल सांगितले.

 

 

नंतर थोड्या वेळाने त्याचा भाऊ व वडील शेतातून घरी आले. आईने सूरजच्या एक्सीडेन्ट बद्दल सांगितले तेव्हा ते त्याला सर्व विचारत होते. सूरज म्हणत होता, सध्या मला कुणी ह्या विषयावर बोलू नका. मला बैचेनी होत आहे व माझ्या समोर सर्व तोच प्रसंग पुन्हा पुन्हा दिसत आहे. सूरज रात्री झोपला नाही. जेवणपण केले नाही.

दुसरे दिवशी वडील त्याला डॉक्टरकडे नेण्यासाठी निघाले. तेव्हा पहिले सूरज म्हणाला की, “मला कुणाच्या वाहनात बसायचे नाही.”
तेव्हा वडीलांनी त्याला बरेच समजावून सांगितले व म्हटले आपण प्रायव्हेट वाहान करून हळू हळू जाऊ. घाबरू नकोस. जेव्हा त्याला फिजिशियन डॉक्टरांना दाखवले तेव्हा त्याचा बी.पी. व पल्स वाढली होती व श्वासाची गती पण वाढली होती. डॉक्टरांनी सर्व इतिहास ऐकल्यानंतर काही गोळ्या देऊन मनोविकारतज्ञाकडे पाठवले.

 

 

मनोविकारतज्ञाने त्याला अॅडमीट करून उपचार सुरू केला व

नातेवाईकांना समजावून सांगितले की, “त्याच्या समोर कुणीही आला तरी त्या घटलेल्या अॅक्सीडेन्ट विषयी बोलू नका. त्याची काळजी घ्या. लक्ष ठेवा. ”

तीन चार दिवसात सूरजला बरे वाटू लागले. जेवण व्यवस्थित घेत होता. झोप चांगली येत होती. समोर दिसणारे चित्र आता दिसत नव्हते. तरी पण थोडा शांत शांत राहत होता. पाच दिवसांनी हॉस्पीटल मधून सुट्टी झाल्यावर काही दिवस गोळ्यांचा कोर्स केला व त्यातून तो बरा झाला.

 

जनरलाईजड अँझायटी डिऑर्डर (GENERALIZED ANXIETY DISORDER)

जर छोट्या छोट्या घटनेतून दिवसभर सारखी व जास्त प्रमाणात चिंता व काळजी असे साधारण सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त होत असेल आणि सोबत अंग दुखी, चिडचिडेपणा; झोप न येणे; बैचेनी होत असेल; एकाग्रता होत नसेल; तर जनरलाईज्ड अॅसायटी डिसऑर्डर असे म्हणतात.

ही बैचेनी, चिंता इतर मानसिक आजाराची नसून तसेच इतर शारीरिक आजाराची किंवा दारू किंवा नशेच्या पदार्थाच्या सेवनामुळे

झालेली नसावे. कारणे

• यामध्ये मेंदूमधील न्यूरोट्रान्समिटरचे असमतोल होते.

. अनुवंशीकता काही प्रमाणात दिसून येते. पेट स्कॅनच्या अभ्यासानुसार मेंदूमध्ये सुद्धा काही बदल जाणवतात.

 

उपचार
* औषधोपचार
* कॉगनेटीव्ह बिहेव्हिअर थेरपी
* रिलॅक्शेसन थेरपी
* सपोर्टीव्ह थेरपी
प्रकाश ३० वर्षे वय. रेल्वे स्टेशनवर हमालीचे काम करतो. त्याला नेहमी चिंता होत असे की त्याचा उदरनिर्वाह व्यवस्थित होईल की नाही. कामात मन लागत नसे. बैचेनी होत असे. छोट्या छोट्या गोष्टीचा ताण घेत असे, उदा. कधी कधी त्याला वाटे की जर एखाद्या पॅसेंजरची बॅग डोक्यावरून पडून खराब झाली तर माझे कसे होईल. मला दिवसभर काम नाही मिळाले तर कसे होईल. त्याला रात्री झोप लागत नसे. कधी कधी तर त्याला असे विचार येत की मी माझ्या मुलीचे शिक्षण करू शकेल का ? किंवा म्हाताऱ्या आईवडीलांना आजार झाला तर उपचार करू शकेल का?
त्याला नंतर अंगदुखी व डोके दुखीचा त्रास सुरू झाला व घरी छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करत असे. त्यामुळे त्याचे त्याच्या बायकोसोबत भांडण होत असे. अशा ताणतणावामध्ये त्याला मित्रांसोबत दारूचे व्यसन लागले व मग ताण कमी करण्यासाठी रोज दारू पीत असे. एक दोन महिन्यांनी त्याच्या बायकोने त्याची दारू सोडवण्यासाठी मनोविकारतज्ञाकडे व्यसनमुक्ती केंद्रात भरती केले. डॉक्टरांनी त्याची सविस्तर हिस्ट्री घेतली तेव्हा डॉक्टरांच्या असे
लक्षात आले की याला प्रथम जनरलाईज्ड अॅन्झायटी डिसऑर्डर म्हणजे चिंतारोग आहे व त्याला सहन न होत असल्यामुळे दारूचे व्यसन लागले. डॉक्टरांनी प्रथम त्याचे दारूचे व्यसन बंद केले व त्याला जनरलाईज्ड अँन्झायटी डिसऑर्डरची औषधोपचार सुरू केले. आता तो दररोज व्यवस्थित काम करतो व दारू सुद्धा पीत नाही.
डॉ. सुभाष काळे, मानसोपचार तज्ञ
मन शांती हॉस्पिटल, पाथरी रोड परभणी
error: Content is protected !!