अभिनेत्री अमिषा पटेलची संजय राऊतांना जादू की झप्पी

0 88

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत( यांना आज रोज होणाऱ्या पत्रकार परिषदांमध्ये भाजपवर टीकेचे बाण सोडताना बघतो. संसदेत शिवसेना आक्रमक चेहरा म्हणून थेट अमित शाह आणि मोदींना आव्हान देतानाही आपण अनेकदा पाहिलं आहे. तर दुसरीकडे संजय राऊत पत्रकाराचीही भूमिका बजावत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून सामनातून छापून येणारे राऊतांचे संपादकीय लेख अनेकदा विरोधकांना घायाळ करत असतात. मात्र हेच संजय राऊत कधी वेगळ्या मूडमध्येही दिसून येतात. ते पेटी वाजवतानाचे डान्स करतानाचेही अनेकदा व्हिडिओ  आपण पाहले आहेत. आता एका नव्या व्हिडिओमुळे शिवसेना खासदार संजय राऊत पुन्हा चर्चेत आले आहे. हा व्हिडिओ अभिनेत्री अमिषा पटेलने  तिच्या इन्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात संजय राऊतही आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

व्हिडिओत नेमकं काय?

हा व्हिडिओ हा धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा आहे. या कार्यक्रमाला अभिनेत्री अमिषा पेटल हीनेही हजेरी लावली होती. या कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेते शिवसेनेचे नेते आधीच पोहोचले होते. त्यानंतर या कार्यक्रमात अमिषा पटेलची एन्ट्री होताना दिसून येत आहे. त्यानंतर कार्यक्रमात दाखल झालेली अमिषा थेट संजय राऊतांकडे जाते आणि त्यांची भेट घेते. संजय राऊत आणि अमिषा पटेलच्या या झप्पीची सध्या सोशल मीडियावरही बरीच चर्चा आहे. दुसरीकडे धर्मवीर या चित्रपटाचीही सध्या तुफान चर्चा आहे. त्यामुळे या टिमला शुभेच्छा देण्यासाठीच अमिषा पेटलही या ठिकाणी पोहोचली होती. त्यावेळचा व्हिडिओ तिने इन्स्टावर शेअर करत या टिमला शुभेच्छा असे कॅप्शनही दिले आहे.

व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा

स्वर्गीय शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर अधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. त्यात सलमान खान, रितेश देशमुख अशा बड्या बॉलिवूड अभिनेत्यांचाही समावेश होता. संजय राऊत हे राज्याच्या राजकारणात रोज चर्चेत असणारे नाव आहे. शिवाय अभिनेत्री अमिषा पेटलच्या नावावरही अनेक बड्या चित्रपटांची यादी आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना अमिषा पटेलने, कहो ना प्यार है, गदर अशा कायम सुपरडुपरहीट चित्रपाटून केले. त्यांमुळी तिची लोकप्रियता आजही मोठी आहे. आज जरी अमिषा चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. मात्र या व्हिडिओत थेट संजय राऊत असल्याने या व्हिडिओवर सध्या कमेंटचा पाऊस पडतोय.

error: Content is protected !!