कळमनुरी (शहर प्रतिनिधी )
कळमनुरी येथे नागरीकाकडून एका वर्षा ऐवजी साठ दिवसाची पाणीपट्टी वसुल करावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी यांनी शासनाकडे केली असता नगर विकास विभागाकडून सदरील निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडून अहवाल मागविला असून जिल्हाधिकारी कार्यालय गोली यांनी हिंगोली नगर परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता यांना चौकशी करण्याचे सूचना दिल्या आहेत.
विशेष म्हणजे कळमनुरी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन केल्यास एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येते परंतु नियोजन आभावी कळमनुरी शहराला वर्षातून साठ दिवस पाणीपुरवठा करण्यात येते कधी आठ दिवस दहा दिवस आड असे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण जनतेकडून नगर परिषदेच्या वतीने एका वर्षाची पाणीपट्टी सक्ती ची वसुली करून डबल अन्याय जनतेवर करण्यात येत आहे याकरिता कळमनुरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे लेखी निवेदन देऊन मागणी केली कळमनुरी शहरातील जनतेकडून एका वर्षा ऐवजी साठ दिवसाची पाणीपट्टी वसुल करावी अशी मागणी केली असता नगर विकास विभागाकडून सदरील निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडून अहवाल मागविला असून जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांनी हिंगोली नगर परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता यांना चौकशी करण्याचे सूचना दिल्या आहेत.
Shabdraj www.shabdraj.com