हिंगोली, दि 08
हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने व्यापार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यापारी बांधवांचा सत्कार व गौरव समारंभ शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी गणेश इन हॉटेल, हिंगोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमात हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मा. आ. श्री. गजाननरावजी घुगे यांची मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हिंगोली जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत व अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्ह्यातील व्यापारी वर्गाच्या विविध समस्या शासनदरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
तसेच श्री. पंकज अग्रवाल यांना दैनिक लोकमतच्या वतीने ‘हिंगोली रत्न’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचाही हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
याशिवाय धर्माबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी परिषदेत हिंगोली जिल्ह्यातील चार व्यापाऱ्यांचा त्यांच्या व्यापार व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव करण्यात आला होता. यामध्ये श्री. जेठानंदजी नेनवाणी, श्री. सूर्याजी शिंदे, श्री. दीपक निमोदिया आणि श्री. मुरली हेडा यांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल श्री राजेश जी अग्रवाल यांचा देखील सत्कार करण्यात आला.तसेच माहेश्वरी सभा हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रमोद जी मुंदडा यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर मा आ गजाननरावजी घुगे, रमेशशेठ बगडिया, श्यामशेठ मुंदडा, कांताशेठ गुंडेवार, सुधीर आप्पा सराफ, अशोक जी मुंदडा, अशोक जी बासटवार, सुदर्शन जी कंदी, पंकज अग्रवाल, जेठानंदजी नेनवाणी, सूर्याजी शिंदे, दीपक जी निमोनिया, एडवोकेट महेश बियाणी, मुरली हेडा, त्रिलोकचंद सोनी, आनंद निलावार, आशिष पिंगळकर आदी मान्यवर व्यासपीठावर होते.
व्यापारी हा केवळ व्यवसाय करणारा घटक नसून समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासात त्याचे महत्त्वपूर्ण योगदान असते. व्यापार क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांमध्ये योगदान देणाऱ्या व्यापारी बांधवांचा सन्मान होणे ही संपूर्ण व्यापारी समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
या सत्कार समारंभास हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाशी संलग्न ग्रेन मर्चंट असोसिएशन, फर्टिलायझर असोसिएशन, किराणा असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, इलेक्ट्रॉनिक असोसिएशन, भांडे असोसिएशन, कापड असोसिएशन, कन्सुमर प्रॉडक्ट असोसिएशन, सराफ असोसिएशन, सिमेंट हार्डवेअर असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, इंडस्ट्रियल असोसिएशन, कर सल्लागार असोसिएशन, तसेच जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी , सदस्य व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यापारी संघटनांमध्ये परस्पर समन्वय, एकजूट आणि सहकार्य अधिक मजबूत करण्यावरही भर देण्यात आला. व्यापाऱ्यांच्या हितासाठी भविष्यातही एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार उपस्थित व्यापारी बांधवांनी व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, विविध असोसिएशनचे पदाधिकारी तसेच सर्व व्यापारी बांधवांनी मोलाचे सहकार्य केले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सत्कार समारंभामुळे व्यापारी वर्गात आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आशिष पिंगळकर यांनी केले तर आभार आनंद निलावार यांनी मानले…
Shabdraj www.shabdraj.com