उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळल्याची माहिती समोर आली असून, महालक्ष्मी रेसकोर्स येथून मुरबाडमधील एका लग्नसोहळ्यासाठी जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर कल्याण परिसरात अचानक आलेल्या वादळात अडकले. सुदैवाने, पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून हेलिकॉप्टरमधील सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत. या थरारक घटनेनंतर उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे जुहू विमानतळावर तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले असून, या प्रसंगावधानामुळे मोठा धोका …
Read More »मुंबई / कोकण
मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती, तर सोलापूर-धाराशिवसाठी अभियांत्रिकीची भेट!
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी, विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये आदिवासी आश्रमशाळांची श्रेणीवाढ आणि नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याचा समावेश आहे आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय. स्वयंसेवी संस्थाच्या पाच प्राथमिक व १९ माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ. प्राथमिकमधून माध्यमिक आणि …
Read More »विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी!
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल …
Read More »सरकारी कर्मचाऱ्यांवर सरकार मेहेरबान…थेट तीन टक्यांची वाढ…
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच सरकारी नोकरी करणाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता नेमका कधी मिळणार? असे विचारले जात होते. दरम्यान, आता राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी तसेच पात्र कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर मिळालेली आहे. आता सरकारने अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तशी माहिती वित्त राज्यमंत्री आशिस जयस्वाल यांनी सांगितले आहे. या निर्णयानुसार आता महागाई भत्ता 55 …
Read More »पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार आणि अमोल मिटकरी आक्रमक
मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी हे आक्रमक झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती निधन झालं, याबाबत पुरावे असताना पोलीस कारवाई का करत नाहीत, असा सवाल त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन उपस्थित केला. यावेळी पोलीस ठाण्यामध्ये बाचाबाची झाल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार आणि अमोल मिटकरी आक्रमक झाल्याचे दिसून …
Read More »राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार,भाजपाकडून विनोद तावडे ?
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपला ‘पत्ता’ खोलला आहे. सोमवारी रात्री पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, पक्षाची सर्व धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवत त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची …
Read More »‘दादांचे मित्र आज व्हीएसआरला का वाचवतात?रोहित पवारांचा नेमका रोख कोणाकडे?
VSR नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा असून यात सत्तेतील आणि राजकीय संबंध असलेले मोठे उद्योगपती सामील आहेत. हे एक राजकीय किंवा व्यावसायिक कटकारस्थान असू शकते आणि डीजीसीएचे (DGCA) मोठे अधिकारीही यामागे आहेत, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत केला. अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी या देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि …
Read More »विमान कंपनी मालकाच्या मुलाचं केंद्रीय मंत्र्याशी कनेक्शन-रोहित पवार
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी आज आणखी काही खळबळजनक आरोप केले. अजित पवार यांच्या विमान अपघातामागे कशाप्रकारे घातपात असू शकतो, अशी थिअरी मांडण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला. यावेळी रोहित पवार यांनी भाजपच्या ट्रोलर्सचाही समाचार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात की, मी भावनेच्या भरात बोलतोय. पण मी भावनेच्या भरात बोलत असेन तर भाजप …
Read More »पायलटच्या मदतीनेच अजित पवारांचा घातपात:रोहित पवारांचा हादरवणारा आरोप
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशी बारामतीत दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी असतानाही वैमानिक कॅप्टन सुमित कपूर याने विमान माघारी न फिरवता खाली उतरवले. त्याने विमानाचा स्फोट (Plane Blast) करण्यासाठी विमान मुद्दाम खाली आदळले, असा खळबळजनक आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी रोहित पवार यांनी अजित …
Read More »अजित पवारांच्या मृत्यूच्या चार दिवसांत 75 संस्थांना अल्पसंख्यांक मान्यता
राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असताना अल्पसंख्यांक विभागाकडून 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासांतच प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाल्याचा आरोप होत आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती होती. तरीही ही स्थगिती डावलून मंत्रालयातून गुपचूपपणे मान्यता देण्यात आल्याचे बोलले जात आहे. दुखवट्याच्या …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com