आज देशभरात धनत्रयोदशी साजरी करण्यात येत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं-चांदी खरेदीचा उत्साह वाढतो. आज जर तुम्ही सोनं खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महागाईच्या वाढच्या चिंतेमुळं आंतरराष्ट्रीय दरात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीमुळं शुक्रवारी सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
गुरुवारी सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र शुक्रवारी डॉलरचा भाव स्थिर झाल्यामुळं आणि गुंतवणुकदारांनी केलेली विक्री यामुळं दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती घसरल्या आहेत. गेल्या 24 तासांत आंतरराष्ट्रीय सोन्याचा भाव 0.68 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 4,060 डॉलरवर आला आहे. तर चांदीचा भाव 0.15 टक्क्यांनी वाढून 52 डॉलरवर पोहोचला आहे. अमेरिकेने सोन्याचे वायदे 0.91 टक्क्यांनी घासरून प्रति औंस 4,075.90 डॉलरवर आले आणि चांदीचा भाव 0.68 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 53.02 डॉलरवर आला.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 4 डिसेंबरला देशांतर्गंत सोन्याचे वायदे 1.16 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,42,421 रुपयांवर आले. तर चांदीचे दर 1.36 टक्क्यांनी वाढून प्रति किलोग्रॅम 1,84,600 रुपयांवर पोहोचले. एमसीएक्स स्पॉट गोल्ड गुरुवारच्या सत्रात प्रति 10 ग्रॅम 1,43,184 रुपयांवर आणि चांदी प्रति किलोग्रॅम 1,87,490 रुपयांवर बंद झाली.
प्रति ग्रॅम दर
आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 14,346 रुपये असून कालच्या तुलनेत 1.8 टक्क्यांनी कमी आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 13,150 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 10,759 रुपये इतका आहे.
तोळ्याचा दर काय?
24-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 2560 रुपयांनी घसरून 1,43,460 रुपयांवर आला. तर, 24-कॅरेट सोन्याचा दर 2350 रुपयांनी घसरून 1,31,500 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे, 18-कॅरेट सोन्याचा दरही 1930 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,07,590 रुपयांवर आला आहे. या महिन्यात आत्तापर्यंत सोन्याच्या दरात सुमारे 3.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Shabdraj www.shabdraj.com