गंगाखेड प्रतिनिधी | रामप्रसाद ओझा शहरात पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, राजस्थान गल्ली परिसरातील एका महिलेवर सराफा बाजारात दुचाकीस्वारांनी हल्ला करून सोन्याचे गंठण हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे. राजस्थान गल्ली येथील रेश्मा बालाजी गुंडाळे या नेहमीप्रमाणे सकाळी सुमारे चार …
Read More »मराठवाडा
व्यापार व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल व्यापारी बांधवांचा गौरव
हिंगोली, दि 08 हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने व्यापार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यापारी बांधवांचा सत्कार व गौरव समारंभ शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी गणेश इन हॉटेल, हिंगोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मा. आ. श्री. गजाननरावजी घुगे यांची मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हिंगोली …
Read More »चित्रकला भावनिक, सर्जनशील व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम-गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे
-नूतन विद्यालयात शासकीय बालचित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न झाली सेलू / प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित शासकीय बालचित्रकला स्पर्धा नूतन विद्यालय, सेलू येथे उत्साहात पार पडली. यावेळी गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांनी चित्रकला ही विद्यार्थ्यांच्या भावनिक, सर्जनशील व व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती, एकाग्रता, सौंदर्यदृष्टी, हस्तकौशल्य तसेच स्वतंत्र अभिव्यक्ती विकसित होते. विद्यार्थ्यांनी चित्रकलेतील विविध संधींचा …
Read More »गंगाखेडात ‘सेफ फूड’ अभियान कागदावरच; अन्न प्रशासनाचा ‘कानाडोळा’?
रामप्रसाद ओझा | गंगाखेड प्रतिनिधी गंगाखेड : नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या अन्नसुरक्षेच्या प्रश्नाकडे अन्न व औषध प्रशासनाचे स्थानिक पातळीवरील दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. राज्यभर ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ अभियानाच्या माध्यमातून अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती तसेच तपासणी व कारवाई केली जात असताना गंगाखेड शहर व तालुक्यात मात्र या अभियानाचा प्रभाव दिसतोय का? असा सवाल …
Read More »बहुमताच्या राजकारणात गंगाखेडचा विकास बळी!
१५५ विकासकामांना सभागृहातच ‘ब्रेक’; सर्व २४ ठराव फेटाळले भुयारी गटार, पाणीपुरवठा, गोदावरी स्वच्छता, रस्ते, दलित वस्ती विकास, नगरोत्थानसह कोट्यवधींच्या योजनांवर पाणी; अवघ्या काही मिनिटांत सभा संपुष्टात रामप्रसाद ओझा | गंगाखेड प्रतिनिधी – गंगाखेड नगर परिषद कार्यालयातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात शुक्रवारी (दि. ३१ जुलै) सकाळी ११ वाजता नगराध्यक्षा सौ. उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सर्वसाधारण सभा शहराच्या विकासाच्या दृष्टीने …
Read More »राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांच्या सिबिलवर कर्जमाफीची टांगती तलवार
हिंगोली | प्रतिनिधी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’ अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत पीक कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत सरकारकडून संपूर्ण कर्जफेड न करता काही रक्कम सरकार भरणार असून उर्वरित रक्कम संबंधित बँकांनी माफ करायची असल्याने ही प्रक्रिया वन टाइम सेटलमेंट (OTS) पद्धतीने राबविण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राज्यातील सुमारे …
Read More »पालम येथे 06 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन
परभणी, दि. 30 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी व माधवराव पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पालम आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (दिंडोरी प्रणित), नाशिक, शाखा पालम यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 06 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 या कालावधीत पालम येथील माधवराव पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे …
Read More »श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कारासाठी डॉ. पवन चांडक यांची निवड
परभणी,दि 27 प्रतिनिधी सन २०२६ चा ‘श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्कार’ परभणी येथील डॉ. पवन चांडक यांना जाहीर झाला आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविणे, मोबाईल व्यसनमुक्तीचा संदेश देणे आणि पुस्तकांशी विद्यार्थ्यांची मैत्री घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या दिवंगत श्याम देशपांडे यांच्या स्मरणार्थ येथील ‘संडे क्लब’ आणि …
Read More »परभणी शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची माहिती…
परभणी / प्रतिनिधी – परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य रायझिंग मेन पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाले असून आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोमवारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे जल अभियंता तन्वीर बेग यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा, गौतमनगर परिसरात मुख्य रायझिंग मेन पाइपलाइन फुटल्याने गेल्या आठवड्यापासून परभणी शहराचा पाणीपुरवठा बंद होता. या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे …
Read More »धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा
सेलू न्यायालयाचा धनादेशाच्या दुप्पट रकमेची नुकसान भरपाई देण्याचा आदेश सेलू / प्रतिनिधी : धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणातील दोन स्वतंत्र खटल्यांमध्ये न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सेलू येथील मा. न्यायाधीश गौरव अ. तराळ यांनी आरोपीस दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, संबंधित धनादेशांच्या दुप्पट रकमेची नुकसानभरपाई फिर्यादीस एका महिन्याच्या आत अदा करण्याचे आदेश दिले आहेत. हा निकाल दि. २२ जुलै २०२६ …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com