08/11/26
Breaking News

मराठवाडा

कानडखेड शिवारातील विहिरीत ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

पुर्णा, ता. १४ (प्रतिनिधी): तालुक्यातील कानडखेड शिवारातील एका विहिरीत अंदाजे ३० ते ३५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी (ता. १३) सकाळी ही घटना उघडकीस आली असून, पुर्णा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णा शहरातील महात्मा गांधी रोड येथील व्यापारी प्रेमचंद नेमीचंद खिंवसरा हे शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कानडखेड शिवारातील …

Read More »

श्रीमद् भागवत जीवन समृद्ध करणारा ग्रंथ – पद्मनाभ महाराज व्यास

सेलू,ता 14 माणसे ज्याचे ध्यान करतात त्याचे गुण माणसात येतात. त्यामुळे जीवन उद्धारक गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करावे. शुद्ध क्रीया, कृती, शब्द, विचार, ध्वनीने मंगलाचरण घडते. संकल्प शक्तीशाली असेल तरच तो सिध्दीस जातो. आपल्या ह्रदयातील ईश्वराचा साक्षात्कार करून देणे हे भागवताचे प्रयोजन आहे. श्रीमद् भागवत जीवन समृद्ध करणारा ग्रंथ आहे. असे प्रतिपादन वे.शा.सं.ह.भ.प.पद्मनाभ महाराज व्यास ( धाराशिव) यांनी केले. कुलकर्णी …

Read More »

सईद खान यांच्या विजयासाठी  महायुती एकवटली,आजी- माजी लोकप्रतिनिधींचा भक्कम पाठींबा

परभणी,ता 14 परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक रंगतदार असून तिरंगी लढतीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयासाठी संपूर्ण महायुती एकवटली असल्याचे चित्र सध्यातरी निर्माण झाली आहे. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना अल्पसंख्या विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना उमेदवारी देण्यात आली.महायुतीचे पारडे भक्कम झाल्याचे चित्र आहे. महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयासाठी पालकमंत्री …

Read More »

श्रावंती चव्हाण यांना पीएच.डी.पदवी प्रदान

गंगाखेड /प्रतिनिधी येथील श्री संत जनाबाई महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कला शाखेतील गुणवंत विद्यार्थिनी कु.श्रावंती श्रीराम चव्हाण यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यांनी नुकतीच पीएच.डी.पदवी प्रदान केली आहे.श्रावंती चव्हाण यांनी तत्त्वज्ञान विषयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मानवतावादी तत्त्वज्ञान एक चिकित्सक अभ्यास या विषयावर संशोधन करून विद्यापीठाकडे शोधप्रबंध सादर केला होता.विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा प्लेग्रिझम अहवाल …

Read More »

महायुतीचे उमेदवार सईद खान यांचा विजय निश्चीत,आ.राजु नवघरे यांच्या उपस्थित राष्ट्रवादीने केला विजयाचा निर्धार

हिंगोली, दि. 13 : परभणी–हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना उमेदवार सईद खान यांच्या पाठीशी हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार वसमत येथे झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेना संपर्कप्रमुख …

Read More »

आता गुटखा माफियांवर थेट मकोका,तुकाराम मुंडेचा धाडसी निर्णय

मुंबई: राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध छुप्या साम्राज्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. राज्यातील गुटखा माफियांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी आता थेट ‘मकोका’ (MCOCA – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे गुटखा …

Read More »

मनमानी MRP म्हणजे कायदेशीर लूट! ग्राहक शोषणाविरोधात केंद्र सरकारकडे थेट हस्तक्षेपाची मागणी

गंगाखेड प्रतिनिधी / रामप्रसाद ओझा बाजारातील एमआरपी (कमाल किरकोळ विक्री मूल्य) व्यवस्था ग्राहक संरक्षणाऐवजी आर्थिक शोषणाचे साधन बनत असल्याचा गंभीर आरोप करत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने पंतप्रधान, केंद्रीय वित्त मंत्री व ग्राहक व्यवहार मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. उत्पादक कंपन्या उत्पादन खर्चाच्या कित्येक पटीने जास्त एमआरपी छापून तथाकथित “डिस्काउंट”च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक …

Read More »

योग दिनानिमित्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रमात सहभागी होण्याचे सिईओ विवेक गायकवाड यांचे आवाहन

हिंगोली, दि. 12 : आयुष मंत्रालय व पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार तसेच हॅबिल्ड हेल्थ टेक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त दि. 14 जून 2026 रोजी सकाळी 6.15 ते 7.35 या वेळेत युट्यूबच्या माध्यमातून विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) मध्ये अधिकृत नोंद …

Read More »

खडकपुरा गल्लीत गोदामावर धाड,92 हजार 248 रुपयांचा मुद्देमाल जप्त

गंगाखेड,दि 12  गंगाखेड शहरातील खडकपुरा गल्लीत दि १० जुनच्या मध्यरात्री अवैध गुटखा साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री अचूक धाड टाकत मोठी कारवाई केली. रात्री ठीक २ वाजता झालेल्या या कारवाईत विमल, राजनिवास डायरेक्टर या ब्रँडचा ₹92,248 किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. अचानक झालेल्या छाप्यामुळे आरोपी गौरव चौधरी याला पळ काढण्याची संधीच मिळाली नाही. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेत आरोपीसह मुद्देमाल …

Read More »

माजी सैनिक स्व दत्तात्रय शिंदे यांना विविध उपक्रमाने अभिवादन

गंगाखेड प्रतिनिधी :- स्वर्गीय दत्तात्रय शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि १० जून रोजी उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन, रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम व वृक्षारोपण करून विविध उपक्रमांनी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रथम तालुक्यातील महातपुरी येथे फौजी फॉर्म येथे परिवारांच्यावतीने स्व दत्तात्रेय शिंदे यांच्या समाधीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे माजी सैनिक स्व दत्तात्रेय शिंदे यांच्या पुण्यतिथी …

Read More »