17/07/26
Breaking News

योग दिनानिमित्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रमात सहभागी होण्याचे सिईओ विवेक गायकवाड यांचे आवाहन

हिंगोली, दि. 12 : आयुष मंत्रालय व पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार तसेच हॅबिल्ड हेल्थ टेक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त दि. 14 जून 2026 रोजी सकाळी 6.15 ते 7.35 या वेळेत युट्यूबच्या माध्यमातून विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) मध्ये अधिकृत नोंद करण्याचा मानस असून, देशभरातून मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे.
हा उपक्रम जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर प्रभावीपणे राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याअंतर्गत गावातील सर्व नागरिक, महिला बचत गट, युवक मंडळे, शाळा, अंगणवाडी सेविका तसेच विविध सामाजिक संस्थांना या उपक्रमाची माहिती देऊन त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी दवंडी, व्हॉट्सॲप गट, नोटीस बोर्ड आदी माध्यमांतून व्यापक प्रसिद्धी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रत्येक सहभागधारकाने 1800-315-7008 या टोल-फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल देणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या व्हॉट्सॲपवर युट्यूब लिंक प्राप्त होईल. त्यानंतर प्रत्येक सहभागधारक आपल्या मोबाईलवरून स्वतंत्रपणे लॉग-इन करून योग सत्रात सहभागी होऊ शकेल. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रत्येक नोंदणीकृत सहभागधारकाचे डिव्हाईस अधिकृतरीत्या नोंदविण्यात येणार आहे.
दि. 14 जून 2026 रोजी सकाळी 6.15 ते 7.35 या वेळेत आयोजित युट्यूब लाईव्ह योग सत्रात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन भारताच्या या ऐतिहासिक उपक्रमास हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले आहे.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …