हिंगोली,दि 28
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा शाखा हिंगोली यांच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 136 व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांना शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या कर्तृत्व आणि विचारांचा जागर याप्रसंगी करण्यात आला. महात्मा फुले यांचे सामाजिक शैक्षणिक औद्योगिक शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख याप्रसंगी करण्यात आला. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंदू लव्हाळे, लिंबाजी थोरे, शाम राऊत,संदीप काळे,सोपान शिंदे, बालाजी सोनुणे,केशवराव जांबुतकर, सुभाषराव कदम, गंगाप्रसाद शेटे, सुरेश ढोरे, सुमित मुदिराज, कैलाश भोंडवे, सय्यद सय्यद हबीब, गोलू खंडारे,प्रकाश मुंदडा, सुभाषराव पोपळघट, शंकरराव देवकर, पांडुरंग पारस्कर, अनिकेत लव्हाळे, बळीरामजी सातव, गणेश बांगर, गणेश धनमणे याप्रसंगी उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com