केंद्र सरकारने 30 नोव्हेंबरपासून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केल्यानंतर डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) लोकसभेत हे विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची म्हणजे 360 खासदारांच्या मतांची आवश्यकता आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी केंद्र सरकारने मांडलेले हे विधेयक हाणून पाडले होते. मात्र, आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह, द्रमुक व अन्य पक्षांच्या भूमिकेत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय, शिंदे सेनेने ठाकरे गटाचे सहा खासदार फोडल्यामुळे लोकसभेतील त्यांचे संख्याबळ वाढले असून याचा फायदा एनडीएला होणार आहे.
विरोधक आणि सत्ताधारी पक्षाचं राजकीय गणित काय?
हे विधेयक घटनादुरुस्ती विधेयक असल्यामुळे आवश्यक संख्याबळ : 360
एनडीए आघाडीतील घटक पक्ष
भाजप: २४१
तेलुगू देसम पक्ष: १६
शिवसेना (एकनाथ शिंदे): १३
जनता दल (युनायटेड) : १२
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) : ५
जनता दल (धर्मनिरपेक्ष) : २
जनसेना पक्ष : २
राष्ट्रीय लोकदल (RLD) : २
अपना दल (एस) : १
आसाम गण परिषद : १
एजेएसयू पक्ष : १
हिंदुस्तानी अवाम मोर्चा : १
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : १
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा : १
यूपीपीएल : १
एनसीपीआय (तृणमूलमधून बाहेर पडलेले) : २०
शिरोमणी अकाली दल : १
एकूण ३२१
एनडीएबाहेरील समर्थक
(मागील वेळी मदत केलेले)
– वायएसआर काँग्रेस – ४
– अपक्ष – १
– हे धरून एकूण संख्याबळ – ३२६
इंडिया आघाडीतून एनडीएला पाठिंबा देणारे पक्ष
द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), यांचे समर्थन मिळण्याची शक्यता, ते मिळाल्यास
– द्रमुक – २२
– राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – ८
– एकूण संभाव्य म्हणजे एकूण संख्याबळ – ३५६
इंडिया आघाडीत नसून देखील विधेयकाला विरोध करणारा पक्ष
आम आदमी पक्ष: एकूण ३ खासदार
आम आदमी पक्षाने डिलिमीटेशन विधेयकाला महिला आरक्षण विधेयकाशी जोडून मांडण्यास विरोध केला आहे. सध्या लोकसभेच्या असेलल्या जागांमध्ये महिलांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे
Delimitation Bill: इंडिया आघाडीतील उर्वरित घटक पक्ष
काँग्रेस
एकूण खासदारः 100
सध्या लोकसभेच्या असलेल्या जागांमध्ये महिलांना आरक्षण द्या, डीलिमीटेशन विधेयकाला आमचा पाठिंबा नाही
शिवसेना (ठाकरे गट)
एकूण खासदारः 3
डिलिमिटेशन हा देशाच्या जनतेकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी रचलेला भाजपचा कट आहे. जो कोणी याला पाठिंबा देईल, तो देशाच्या जनतेशी विश्वासघात करत आहे… ते २१व्या शतकातील सगळ्यात मोठे गद्दार म्हणून ओळखले जातील!म्हणून प्रत्येक देशप्रेमी लोकशाहीवादी पक्षाने सभागृहात डिलिमिटेशनला ठोकरून काढले पाहिजे. “इतिहास गद्दारांची नावे सदैव लक्षात ठेवतो; गद्दारी बाबत केलेले खुलासे हवेत विरून जातात.
समाजवादी पार्टी
एकूण खासदारः 37
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्वीट करत ‘डिलिमिटेशन’ ही भाजपच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक ठरेल
असं म्हणत डिलिमिटेशन विद्येयकाच्या विरोधात स्पष्टपणे भूमिका मांडली आहे
टीएमसी ममता बॅनर्जी पक्ष
एकूण खासदारः 8
ममता बॅनर्जी यांचा पक्षाचा डिलीमीटेशन विधेयकाला विरोध केला आहे
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
एकूण खासदारः 4
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष डीलिमीटेशन विधेयकाला विरोध आहे
सीपीआय
एकूण खासदारः 2
सीपीआय पक्षाचा डीलिमीटेशन विधेयकाला विरोध आहे
सीपीआयएमएल
एकूण खासदारः 2
झारखंड मुक्ती मोर्चा
एकूण खासदारः 3
डीलिमीटेशन विधेयकाचा आत्तापर्यंत विरोध केला असून आदिवासी समाजाच्या आरक्षणावर गदा येईल अशी भूमिका आत्तापर्यंत घेतली आहे नवीन विधेयकानंतर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं
राष्ट्रीय जनता दल
एकूण खासदारः 4
राष्ट्रीय जनता दलाने डीलिमीटेशन विधेयकाला विरोध आहे
इंडियन युनियन मुस्लिम लीग
एकूण खासदारः 3
इंडियन मुस्लिम लीग पक्षाचा विधेयकाला विरोध आहे
Shabdraj www.shabdraj.com