सेलू ( प्रतिनिधी )
येथील रेल्वे स्थानकावर पंतप्रधान अमृत कलश योजने अंतर्गत विकास कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत त्यामुळे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर अनेक गैरसोयी निर्माण झाल्या आहेत त्या तात्काळ दूर कराव्यात अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाने निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की वार्षिक ९ कोटी रुपये उत्पन्न व महाराष्ट्र शासनाचा निर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या सेलू स्थानकावर स्वच्छता गृहा अभावी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, तसेच पुढील महिन्यात दतजयंती निमित्य सद्गुरू केशवराज बाबासाहेब महाराजांची (व्यकुशाह) यात्रा, सिमुर गव्हान (नानीजधाम उपपिठ ) येथील दत्तजयंती निमित्य राज्यभरातून व परराज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक सेलू येथे येतात त्यामुळे नगरसोल- नरसापूर व नरसापूर- नगरसोल या रेल्वे गाडयांना सेलू स्थानकावर थांबा /STOP तात्काळ मंजुर करावा व छ.संभाजीनगर येथून जालना- सेलू – परभणी- पूर्णा-हिंगोली- अकोला- अमरावती- नागपूर अशी नवीन रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवनारायण मालाणी, प्रविण मानकेश्वर, मोहन खापरखुंटीकर, मनिष कदम, आनंद बाहेती, अभिजित राजुरकर, रामवल्लभ राठी, अजित मंडलिक, इश्वर जैन, श्रीपाद कुलकर्णी, प्रशांत नावाडे, डॉ. प्रविण जोग, कैलास कदम, शेख मुनीर, कृष्णा काटे, भगवान पावडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Shabdraj www.shabdraj.com