औंढा नागनाथ (प्रतिनिधी )
औंढा तालुक्यात सहा परीक्षा केंद्रावर दिनांक २८ नोव्हेंबर रोजी नवोदय ची परीक्षा घेण्यात आली. सदरील परीक्षेत १३५९ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ५९ विद्यार्थी गैरहजर राहिले. केंद्रनिहाय माहिती अशी की, १) जिल्हा परिषद शाळा औंढा- 228 विद्यार्थी २) जिल्हा परिषद शाळा शिरडशहापूर- 230 विद्यार्थी ३) इंदिरा गांधी विद्यालय जवळाबाजार- 224, ४) केंद्रीय जिल्हा परिषद शाळा जवळा बाजार- 232, ५) राधाराम माध्यमिक आश्रमशाळा औंढा नागनाथ – 229 ६) माध्यमिक उच्च माध्यमिक नागनाथ विद्यालय औंढा नागनाथ -207 या सहा परीक्षा केंद्रावर नवोदयची परीक्षा घेण्यात आली. सदरील परीक्षा शांततेत व काफीमुक्त वातावरणात घेण्यात आली. याकरिता प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे व कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक परीक्षा केंद्राला गटशिक्षणाधिकारी श्रीमती नीता भरोसे, शिवाजी टोम्पे यांनी भेटी देऊन परीक्षा केंद्राची पाहणी केली.
Shabdraj www.shabdraj.com