: कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीचे दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन संपलेले आहे. हे आंदोलन संपलेले असले तरीही सीजेपीची चर्चा मात्र अजूनही सुरूच आहे. आंदोलन मागे घेताना सरकार कोणत्याही आंदोलकाविरोधात गुन्हा दाखल करणार नाही, कोणावरही पोलीस कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आश्वासन मिळालेले असले तरीही देशभरात अनेक ठिकाणी सीजेपीच्या आंदोलकांवर कारवाई केली जात आहे, असा आरोप सीजेपीने केला आहे. …
Read More »राजकारण
आता १० वर्षांची शिक्षा, १० कोटींचा दंड बसणार; नव्या विधेयकाला मंजुरी
Centre’s major decision on the NEET paper leak case नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विरोधाचा आगडोंब उसळला आहे. पेपरफुटीमुळे २० हून अधिक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना विविध ठिकाणी घडल्या. या घटनांनंतर नव्याने स्थापन झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीने जंतर-मंतरवर आंदोलनाची सुरुवात केली. पेपरफुटी थांबवणे ही शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी होती. त्याबद्दल त्यांचा राजीनामा घेतला जावा, या मागणीसाठी तीव्र आंदोलन उभारले गेले. यानंतर केंद्र …
Read More »राजघाटावर जाणाऱ्या राहुल गांधी यांचा ताफा अडवला
दिल्ली : नीट पेपरफुटी आणि जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडले आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका विरोधी पक्षाने घेतल्याने सरकार बॅकफूटवर गेले आहे. गेले तीन दिवस लोकसभेचे कामकाज ठप्प आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांची रणनीती ठरविण्यासाठी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर राहुल गांधी …
Read More »राहुल गांधी विद्यार्थ्यांसाठी मैदानात, सरकारकडे ३ मागण्या
नवी दिल्ली : विद्यार्थी शांततापूर्वक मार्गाने आंदोलन करीत आहेत. एकेकाळी भारतातील शिक्षण संस्थेचा जगात गवगवा होता, आता त्याच शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. १५२ पेपरफुटीची प्रकरणे गेल्या १० वर्षात समोर आले आहेत. अनेकदा पेपरफुटीच्या घटना झाल्या पण त्या समोर आल्या नाहीत. लाखो विद्यार्थी अनेक परीक्षांची ५-५ वर्षे तयारी करतात. परंतु शेवटच्या क्षणी त्यांना सांगितले जाते की पेपरफुटी झाली. ज्यांच्याजवळ ४०-५० लाख …
Read More »राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात
नीट पेपरफुटी आणि दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्ज प्रकरणी काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केलं. तीन तासांहून जास्त काळ राहुल गांधी आणि त्यांच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या निवासस्थाबाहेर आंदोलन केलं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या खासदारांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकार संसदेत …
Read More »राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, थेट मोदींच्या घराला घेरावा
नवी दिल्ली : आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सरकारच्या दारात आंदोलनाला बसलेले उद्याच्या भारताचे भविष्य अर्थात विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीहल्ला केल्याप्रकरणी सरकारने संसदेत चर्चा करावी, अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. मात्र चर्चेसाठी सरकारची परवानगी लागेल, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगून चर्चा टाळल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. त्यानंतर सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्षाचा पवित्रा राहुल गांधी यांनी घेतला …
Read More »ठाकरे गटाला मोठा धक्का! 6 खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयाने अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले …
Read More »सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडायला हवं?
सध्याचं जग गाढवासमोर वाचली गीता यासारखं आहे. कोणी कोणाचं ऐकतच नाही व कोणाला कोणाचं ऐकून घ्यायलाही अजिबात वेळ नाही. सध्या होत असलेलं सोनम वांगचूक यांचं आमरण उपोषण. ज्या उपोषणाचा मुख्य मुद्दाच धर्मेश प्रधानचा राजीनामा आहे. नीट पेपर फुटतांना भ्रष्टाचार झाला. हे कॉक्रोज जनता पार्टीचं म्हणणं. ज्याला उपोषणानं सोनम वांगचूक यांनी समर्थन दिलं. ज्यात धर्मेश प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच हवा. असं …
Read More »शिवसेनेच्या 6 खासदारांचा पक्षप्रवेश अडचणीत? अरविंद सावंतांचा लेटरबॉम्ब, अपात्रतेची शक्यता
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पक्षाच्या सहा खासदारांना पाठवलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. या पत्रात, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कोणत्याही राजकीय पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहा खासदारांच्या विलीनीकरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १३ जुलै २०२६ रोजी संसदीय …
Read More »राजकारणात पुन्हा भूकंप, जयंत पाटील-विनोद तावडे यांच्यात बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार आणि आमदार सत्तेत नसल्यामुळे मतदारसंघातील विकासकामांसाठी थेट ‘एनडीए’मध्ये जाण्यास उत्सुक असल्याच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com