23/06/26
Breaking News

महाराष्ट्र

लोहगडावर नेमक काय घडलं…मयत केतनच्या भावी पत्नीचे कारनामे समोर

लोहगड किल्ल्यावर २६ वर्षीय केतनला दरीत ढकलून त्याची हत्या केल्याप्रकरणी एक अत्यंत खळबळजनक आणि अंगावर काटा आणणारा खुलासा झाला आहे. केतनची हत्या १८ जून रोजी झाली असली, तरी त्यापूर्वी १४ जून रोजी देखील त्याची भावी पत्नी सिया गोयल हिने त्याला लोहगडवरूनच दरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुदैवाने एका झुडपामुळे केतन बचावला, तेव्हा सियाने ‘साप-साप’ असे ओरडत नाटक करत, …

Read More »

बोरी ग्रामस्थांचे उपोषण स्थगित,प्रशासनाकडून अश्वासन …अप्पर तहसिल कार्यालयाचा लढा …

परभणी,दि 23ः बोरी ता.जिंतुर या ठिकाणी मंजूर झालेले अपर तहसील इतर ठिकाणी हलवल्याच्या निषेधार्थ बोरी ग्रामस्थांच्या वतीने गेल्या अकरा दिवसापासून येथील बाजार मैदानावर उपोषण सुरू करण्यात आले होते. हे उपोषण दिनांक 23 जून रोजी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या आश्वासनानंतर उपोषणाला स्थगिती दिल्याची माहिती उपोषण कर्त्यांनी यांनी दिली अप्पर तहसील कार्यालय बोरी येथे सुरु करण्याची सर्व प्रक्रिया झालेली असताना अचनाक …

Read More »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीसाठी अँग्रीस्टँक नोंदणी अनिवार्य – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली, दि. 23 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील एकूण 908 थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, त्यासाठी 3 कोटी 67 लाख 77 हजार 214 इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील 181 शेतक-यांनी अँग्रीस्टँक नोंदणी अद्याप केलेली नाही, अशा शेतक-यांनी कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी अनिवार्य असलेली नोंदणी तात्काळ करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल …

Read More »

 जिल्हा बँक निवडणुकीसाठी भाजपा जिल्हाध्यक्ष  गजाननराव घुगे यांचा उमेदवारी अर्ज

हिंगोली,दि 23 (प्रतिनिधी)ः परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार गजाननराव घुगे यांनी आपले उमेदवारी अर्ज परभणी येथे दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार गजाननराव घुगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, सहकाराची समृद्ध परंपरा जपत जिल्ह्यातील शेतकरी, बँक सभासद आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपण …

Read More »

डिग्रस फाटा दाटेगाव रस्ता व पुलाचे काम सुरू

हिंगोली,दि 23  हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा ते दाटेगाव रस्त्यावर खूपच खड्डे पडले होते हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी डिग्रस येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रयत्न केले. आमदार तानाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या कामासाठी 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. डिग्रस फाटा दाटेगाव रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून या रस्त्यावरील पुलाचे काम सुद्धा सुरू आहे.विशेष म्हणजे डिग्रस फाटा ते दाटेगाव या …

Read More »

सेलूमध्ये महेश नवमीनिमित्त आरोग्य शिबिराला ३२१ नागरिकांचा प्रतिसाद

सेलू ( प्रतिनिधी ) माहेश्वरी समाजाचा पवित्र सण ‘महेश नवमी’चे औचित्य साधून सेलू तालुका माहेश्वरी युवा संघटना आणि माहेश्वरी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक श्री बालाजी मंदिर परिसरात रविवार, २१ जून २०२६ रोजी भव्य रक्त तपासणी, रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि जागरूकता या उद्देशाने आयोजित केलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त …

Read More »

रामवाडी फीडरवरील रात्रीचा सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

कळमनुरी,दि 23 (प्रतिनिधी)ः कळमनुरी तालुक्यातील मसोड उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या रामवाडी फीडरवरील सिंगल फेज वीजपुरवठा बंद असल्यामुळे शेतात वास्तव्यास असलेल्या शेतकरी व शेतमजुरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी मसोड परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे. हे निवेदन कळमनुरी महावितरणचे अभियंता श्री. जयस्वाल यांच्यामार्फत सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात …

Read More »

शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे- मुकुंद आष्टीकर

सेलू ( प्रतिनिधी ) शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व आधुनिक तंत्रज्ञाना लाभ मिळणे अत्यंत गरजेचे आहे .असे प्रतिपादन महसूल विभागातील निवृत्त अधिकारी मुकुंद आष्टीकर यांनी जिजामाता बाल विद्यामंदिर मध्ये सत्कार सोहळा प्रसंगी केले . राजश्री छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजामाता बाल विद्या मंदिर, सेलू या शाळेस विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी व शाळेच्या …

Read More »

आधी ठसा नोंदणी, नंतरच धान्य वितरण – लाभार्थ्यांची गैरसोय

गंगाखेड (प्रतिनिधी): शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य वितरण करताना “आधी थंप (अंगठा) नोंदणी व नंतर धान्य वितरण” अशी अट घालण्यात आल्याने अनेक लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सर्व्हर डाऊन, वीज खंडित होणे, बायोमेट्रिक मशीन नीट काम न करणे यामुळे नागरिकांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेक वेळा थंप नोंदणी यशस्वी होत नसल्याने लाभार्थ्यांना धान्य न मिळताच परतावे …

Read More »

पारडा शिवारातील दुहेरी खून प्रकरण:बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली तालुक्यातील पारडा शिवारातील दुहेरी खून प्रकरणात बासंबा पोलिस ठाण्यात रविवारी ता. २१ अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात बासंबा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत आहेत. याप्रकरणात पोलिसांनी तीन संशयीतांची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली तालु्क्यातील पारडा शिवारातील शेतात बळीराम देवबा वाघमारे (65) व कलावतीबाई बळीराम वाघमारे (60) यांचे मृतदेह …

Read More »