वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी समोर आली आहे. राज्यातील 1 एप्रिल 2029 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्यासाठी आता फक्त एकच दिवसाची मुदत उरली आहे. शासनाने दिलेली 30 जून 2026 ही अंतिम मुदत संपल्यानंतर, म्हणजेच 1 जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. परिवहन विभागाने …
Read More »महाराष्ट्र
सेलूत आज पल्स पोलियो लसीकरण मोहीम; उपजिल्हा रुग्णालयात या मोहिमेचा शुभारंभ
सेलू / नारायण पाटील – राष्ट्रीय प्लस पोलियो लसीकरण दिनानिमित्त आज दि २८ जून रोजी सम्पूर्ण शहरात पल्स लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली . या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सकाळी १० वाजता येथील उपजिल्हारुग्णालयात संपन्न झाला यावेळी सेलू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत ,उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ संजय हरबडे , डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ ऋतुराज साडेगावकर यांच्यासह शहरातील डॉ विलास मोरे ,दिलीप डासाळकर,संजय …
Read More »टीईटीचा पेपर कसा फुटला, नेमकं काय घडलं?
ठाणे,दि 27 ः संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आज उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला (TET Exam 2026 Peper Leak) आहे. टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द (TET Exam Cancle) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांआधी NEET चे पेपर फुटल्याने संपूर्ण देश हादरला …
Read More »सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण
आज (शुक्रवार, २६ जून रोजी) सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतील मोठ्या प्रमाणावरील विक्री आणि व्याजदरांबाबत अमेरिकन फेडरल रिझर्व्हने घेतलेली कडक भूमिका यामुळे गेल्या २-३ दिवसांपासून बाजार दबावाखाली आहे. याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या दरांवर झाला असून किमती सातत्याने खाली येत आहेत. कालच्या तुलनेत किती घसरले सोन्याचे भाव? २४ कॅरेट सोने: आज …
Read More »केतनला कड्यावरून ढकलताच सियाच्या तोंडून निघाले ‘ते’ शब्द
केतन अग्रवाल हत्याकांडाने संपूर्ण राज्याला हादरवून टाकलं आहे. होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी एका कॅफेमध्ये बसून केतनच्या हत्येचा कट रचला. संधी साधून त्यांनी केतनला लोहगडाच्या कड्यावरून ढकलून देत त्याचा जीव घेतला. या प्रकरणात आता दररोज नवनवे खुलासे होत आहेत. केतनचा जेव्हा लोहगडावर मृत्यू झाला तेव्हा सिया तिथेच होती. तिने या घटनेनंतर हा अपघात असल्याचा बनाव …
Read More »पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांची आमदार तानाजी मुटकुळे यांनी घेतली सदिच्छा भेट
हिंगोली (प्रतिनिधी) जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार मुटकुळे यांनी नूतन पोलीस अधीक्षक लोढा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांना हिंगोली जिल्ह्यातील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या सदिच्छा भेटीदरम्यान आमदार तानाजी मुटकुळे आणि पोलीस …
Read More »कळमनुरीतील पाणी पट्टी वसुली प्रकरणाची शासनाकडून दखल
कळमनुरी (शहर प्रतिनिधी ) कळमनुरी येथे नागरीकाकडून एका वर्षा ऐवजी साठ दिवसाची पाणीपट्टी वसुल करावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी यांनी शासनाकडे केली असता नगर विकास विभागाकडून सदरील निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडून अहवाल मागविला असून जिल्हाधिकारी कार्यालय गोली यांनी हिंगोली नगर परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता यांना चौकशी करण्याचे सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे कळमनुरी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी …
Read More »वांझोळा येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.
हिंगोली,दि 26 ः हिंगोली तालुक्यातील मौजे वांझोळा येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण, चंद्रकांत फुंडसे, भगवान कांबळे, श्रीवस्ती बौद्ध विहार महिला मंडळ, आदींची उपस्थिती होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावरील सखोल माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार चंद्रकांत फुंडसे यांनी केले.
Read More »नूतन विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन
सेलू ( प्रतिनिधी ) सेलू् येथील नूतन विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त शुक्रवारी, २६ जून २०२६ रोजी सकाळी अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना शिक्षक राजेंद्र सोनवणे म्हणाले की, शाहू महाराज हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक आणि कोल्हापूर संस्थानचे छत्रपती होते. त्यांनी आयुष्यभर बहुजन समाज, दलित आणि वंचितांच्या उद्धारासाठी कार्य केले. २६ जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय समाजासाठी …
Read More »श्री शिवाजी पॉलिटेक्निकमध्ये बांधकाम कंत्राटदारांसाठी काँक्रीट प्रयोगशाळा भेट व प्रात्यक्षिक कार्यक्रम
परभणी,दि 24 ः परभणी येथील म. शी प्र मंडळ संचालित श्री शिवाजी पॉलिटेक्निक मध्ये दि. 20 जून रोजी कंत्राटदारासाठी काँक्रीट प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्री शिवाजी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, परभणीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत श्री सिमेंट कंपनीतील स्थानिक कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक व साइट सुपरवायझर यांच्यासाठी काँक्रीट प्रयोगशाळा भेट व विविध बांधकाम साहित्य चाचण्यांचे प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com