जिंतूर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मेंढपाळाच्या कळपातील तब्बल ४४ मेंढ्यांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या मृत्यूमुळे मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त मेंढपाळाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान घटनेची माहिती कळताच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून मृत पडलेल्या मेंढ्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत नेमका त्याचा अहवाल आल्यानंतर या मेंढ्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील वडाळी येथे मेंढपाळ पुनाजी येळे हे आपल्या कुटुंबासह जवळपास ३०० हून अधिक मेंढ्या घेवून मुक्कामास होते यावेळी त्यांच्या एक एक करून तब्बल ४४ मेंढ्या अचानक पणे दगावल्या नेमक दूषित चारा,विषबाधा,संसर्गजन्य आजार यापैकी कोणत्या कारणाने दगावल्या हे मात्र स्पष्ट झाले नाही परंतु अचानक पणे एवढ्या मेंढ्या दगावल्याने मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे. वडाळी येथील शेतशिवारात मुक्कामी असलेल्या मेंढपाळाच्या कळपातील तब्बल ४४ मेंढ्यांचा शनिवारी सायंकाळाच्या सुमारास अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली. एकाचवेळी मोठ्या संख्येने मेंढ्या दगावल्याने मेंढपाळाचे आर्थिक नुकसान झाले आहे.बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील असालवाडी येथील मेंढपाळ पुणाजी समाधान येळे हे कुटुंबासह ३०० हून अधिक शेळ्या-मेंढ्यांचा कळप घेऊन वडाळी परिसरात आले होते. त्यांनी शेतकरी प्रकाश दुभाळकर यांच्या गट क्रमांक १७५ मधील शेतात मुक्काम केला होता. दरम्यान, शनिवारी अचानक कळपातील मेंढ्या आजारी पडून त्यापैकी ४४ मेंढ्यांचा मृत्यू झाला.
Shabdraj www.shabdraj.com