परभणी, ६ — नागरिकांना महसुली सेवा जलद गतीने आणि त्यांच्या स्वतःच्या परिसराजवळ उपलब्ध करून देण्यासाठी परभणी शहरात एक मोठा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे.
आतापर्यंत संपूर्ण परभणी शहराचा कारभार एकाच ‘तलाठी साजा’वरून चालत होता, ज्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना विविध दाखले, सातारा-बारा उतारे आणि इतर कागदपत्रांसाठी मोठी कसरत करावी लागत होती. यावर शाश्वत उपाय म्हणून जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी परभणी शहराचे विभाजन करून तीन स्वतंत्र नवीन तलाठी सजांच्या निर्मितीस अधिकृत मान्यता दिली आहे.
या नवीन निर्णयामुळे आता परभणी शहरात खालीलप्रमाणे तीन स्वतंत्र सजा अस्तित्वात आले आहेत.
१. परभणी पूर्व सजा
२. परभणी पश्चिम सजा
३. परभणी गावठाण सजा
या निर्णयामुळे नागरिकांना होणारे फायदे
वेळेची बचतः पूर्वी सर्व कामांसाठी एकाच कार्यालयावर ताण होता, आता तीन स्वतंत्र सजा झाल्यामुळे नागरिकांची कामे वेळेत व जलद गतीने होतील. कामात पारदर्शकता व सुलभताः तलाठी स्तरावरील दाखले, फेरफार नोंदी, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, इतर महसुली कागदपत्रे मिळवणे
अधिक सुलभ होईल.
प्रशासन थेट नागरिकांच्या दारी
प्रशासकीय यंत्रणा अधिक विकेंद्रित झाल्यामुळे जनसामान्यांच्या अडीअडचणी तातडीने सोडवण्यास मदत होईल.
परभणी शहरातील वाढत्या शहरीकरणामुळे आणि लोकसंख्येच्या घनतेमुळे हा निर्णय अत्यंत आवश्यक होता. माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या या दूरगामी निर्णयाचे परभणी शहरातील नागरीक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेकडून जोरदार स्वागत होत आहे. लवकरच या तिन्ही नवीन सजांच्या कार्यालयांचे पत्ते आणि संबंधित तलाठ्यांचे संपर्क क्रमांक नागरिकांच्या माहितीसाठी अधिकृतपणे प्रसिद्ध केले जातील, जेणेकरून नागरिकांना आपल्या कामासाठी योग्य ठिकाणी संपर्क साधता येईल.
दरम्यान, परभणी शहरातील तीन नवीन तलाठी सज्जाची निर्मीती ई फेरफार संगणकीय प्रणालीमध्ये करण्यासाठी दिनांक- 15 नोव्हेंबर 2026 ते 15 डिसेंबर 2026 पर्यत दुययम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी तसेच तलाठी स्तरावरील ऑनलाईन फेरफार नोंदी पुढील आदेशापर्यत बंद राहतील. त्याकरिता परभणी शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी केले आहे.
Shabdraj www.shabdraj.com