08/08/26
Breaking News

ब्रेकिंग न्यूज

धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा; महिनाभराच्या आंदोलनानंतर मोठा निर्णय, जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचा जल्लोष

Dharmendra Pradhan Latest News नवी दिल्ली | २५ जुलै : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज (२५ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. NEET पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीने देशभर आंदोलन छेडले होते. शिक्षणमंत्री …

Read More »

जंतर-मंतर आंदोलनाचा देशभरात वणवा! कॉकरोच जनता पार्टीकडून 24 जुलैला देशव्यापी आंदोलनाची हाक

Jantar Mantar protest spreads nationwide नवी दिल्ली : गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता देशव्यापी स्वरूप धारण केले आहे. अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने शुक्रवार, २४ जुलै रोजी ‘एक दिवस, एक मागणी’ या घोषवाक्याखाली देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील कथित गैरव्यवहार आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या …

Read More »

अभिजित दिपकेंचा पोलिसांना इशारा तर… आंदोलकांना संयम राखण्याचे आवाहन

Sonam Wangchuk नवी दिल्ली – कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी आंदोलकांवर झालेल्या लाठीमारप्रकरणी संबंधित पोलिसांवर न्यायालयीन कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लाठीमाराचा तीव्र निषेध व्यक्त केला.     दिपके म्हणाले, “आंदोलकांवर करण्यात आलेला लाठीमार अत्यंत क्रूर आणि निषेधार्ह होता. लाठीमारासाठी जबाबदार असलेल्या पोलिसांना आम्ही न्यायालयात खेचणार आहोत. आज आमच्या आंदोलनाचा ३४ वा …

Read More »

NEET पेपरफुटी आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा; जंतर-मंतरवर अभिजित दिपकेंची घेतली भेट

Sharad Pawar Meet Abhijit Dipke नवी दिल्ली – कथित नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी जंतर-मंतरवर भेट देत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.     सोमवारी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर शरद …

Read More »

लाडकी बहीण योजना; 92 लाख लाभार्थी अपात्र, तुमचे नाव यादीत आहे का?

Ladki Bahin Yojana मुंबई – राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाभार्थ्यांची पडताळणी, ई-केवायसी (e-KYC) आणि पात्रता निकषांची छाननी पूर्ण झाल्यानंतर 92 लाखांहून अधिक लाभार्थी महिलांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला सुमारे 80 लाख नावे कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र अंतिम पडताळणीनंतर हा आकडा 92 लाखांपेक्षा अधिक …

Read More »

राज्यासाठी हवामानाचा नवा अंदाज; हवामान खात्याने दिला मोठा इशारा

Maharashtra Weather Update News मुंबई : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावत मान्सूनने जूनमधील पावसाची तूट मोठ्या प्रमाणात भरून काढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, हा दिलासा फार काळ टिकण्याची शक्यता नसून, राज्यात मान्सूनच्या प्रवासाला पुन्हा एकदा ब्रेक लागल्याचे चित्र आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, १० ते १५ जुलैदरम्यान राज्यात पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून …

Read More »

विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफी जाहीर

मुंबई  – राज्यातील बळीराजासाठी राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’अंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी ५० हजार रुपये भरण्याची जाचक अट सरकारने पूर्णपणे काढून टाकली आहे. यामुळे राज्यातील तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील …

Read More »

नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये हनिमूनसाठी सजवला First AC कोच; व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वेची मोठी कारवाई

First AC coach of Nandigram Express decorated for a honeymoon First AC coach of Nandigram Express decorated for a honeymoon परभणी – नंदीग्राम एक्स्प्रेसमधील हनिमून सजावट प्रकरणामुळे रेल्वे प्रशासनाला मोठी कारवाई करावी लागली आहे. मुंबई–बल्लारशाह दरम्यान धावणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसच्या First AC कोचमध्ये नवविवाहित जोडप्यासाठी फुले, फुगे आणि सजावटीच्या साहित्याने केबिन सजवण्यात आली होती. या सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात …

Read More »

BREAKING: मराठवाडा पुन्हा हादरला! सलग 4 भूकंपाचे धक्के

परभणी, दि. ९ : परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत आज (९ जुलै) पहाटे एका पाठोपाठ एक असे भूकंपाचे चार सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या भूकंपांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.   पहाटे १:३७ वाजता भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्याची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. त्यानंतर २:१५ वाजता …

Read More »

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी राज्यात नवा नियम; पहा काय झाले बदल

New Driving Licence Rule मुंबई – पावसाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र शासनाने ड्रायव्हिंग लायसन्स आणि बाईक टॅक्सी सेवेसंदर्भात महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय जाहीर केले आहेत. या नव्या नियमांची अंमलबजावणी १ ऑगस्ट २०२६ पासून करण्याचा शासनाचा मानस असून, याबाबतची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली.   नवीन धोरणानुसार, १ ऑगस्ट २०२६ पासून महाराष्ट्रात वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळवण्यासाठी …

Read More »