06/08/26
Breaking News

NEET पेपरफुटी आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा; जंतर-मंतरवर अभिजित दिपकेंची घेतली भेट

Sharad Pawar Meet Abhijit Dipke

नवी दिल्ली – कथित नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी जंतर-मंतरवर भेट देत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.

 

 

सोमवारी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर शरद पवार यांनी जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती अभिजित दिपके यांच्याकडून घेतली. तसेच आंदोलनाशी संबंधित विविध मागण्यांवरही दोघांमध्ये चर्चा झाली.

 

 

यावेळी अभिजित दिपके यांनी शरद पवार यांना सांगितले की, “सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना एकप्रकारे ताब्यात ठेवण्यात आले आहे. दिल्ली आणि मुंबईतील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, देशभरातील आंदोलकांवरील सर्व एफआयआर मागे घेण्यात यावेत आणि सोनम वांगचुक यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत.”

 

 

याशिवाय, दिल्ली पोलिसांच्या कारवाईची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी आंदोलकांकडून करण्यात येत असल्याची माहिती अभिजित दिपके यांनी शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान दिली.

Check Also

लाडकी बहीण योजना; 92 लाख लाभार्थी अपात्र, तुमचे नाव यादीत आहे का?

Ladki Bahin Yojana मुंबई – राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट समोर …