मुंबई : आपल्या मागण्यांसाठी शांततापूर्वक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवला. आपल्या भविष्याविषयी प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याच्या निषेधार्थ वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.
सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी एकत्र येऊन २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा द्यावा असे आवाहन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
Shabdraj www.shabdraj.com