India’s First-Ever CNG Scooter TVS Jupiter नवी दिल्ली : वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी TVS मोटर कंपनीने भारतातील पहिल्या CNG स्कूटरची झलक सादर केली आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आलेली TVS Jupiter 125 CNG ही स्कूटर पेट्रोल आणि CNG या दोन्ही इंधनांवर चालणारी ड्युअल-फ्युएल स्कूटर असून, ती 2026 च्या मध्यापर्यंत बाजारात दाखल होण्याची …
Read More »ब्रेकिंग न्यूज
ऑपरेशन टायगर संकटात:’शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय अजून नाही’, ओमराजेंच्या यू टर्नने, त्या पाच जणांची खासदारकी धोक्यात
‘पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणातही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करेन, त्यानंतर निर्णय घेईन,’ अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचे भवितव्य आता ओमराजे निंबाळकर यांच्या हाती आहे. तूर्तास तरी ऑपरेशन टायगर आणि 5 जणांची खासदारकी संकटात आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे …
Read More »ऑपरेशन टायगरचा दुसरा अंक? ठाकरे गटातील खासदारांबाबत दिल्लीत मोठ्या घडामोडी
दिल्ली – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) मधील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन स्वतंत्र गटाची भूमिका स्पष्ट करणार …
Read More »जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगूल वाजले
राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख 16 ते 21 जानेवारी दरम्यान असणार आहे. अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होणार आहे. मतदान 5 फेब्रुवारीला होणार असून मतमोजणी 7 फेब्रुवारीला होणार असून त्यानंतर निकाल जाहीर होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यक्रम 16 जानेवारी …
Read More »तळीरामांसाठी खुशखबर… नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यविक्रीच्या वेळेत शिथिलता
सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबरची रात्र नेहमीच खास असते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मद्यपींसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यामुळे यंदाचं नववर्ष अधिक दणक्यात साजरं करता येणार आहे. राज्याच्या गृह विभागाने ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. तसेच बार आणि क्लबमध्ये पहाटे ५ वाजेपर्यंत मद्यसेवन करता येणार आहे. अन्य दिवशी मात्र …
Read More »मोठी बातमी… सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर
महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता सीबीएसई (CBSE) बोर्ड परीक्षेचेही वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, 17 फेब्रुवारी 2026 पासून या परीक्षा सुरू होणार आहेत. गेल्याच महिन्यात अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. आता, केंद्रीय परीक्षा बोर्डाने नियोजित वेळापत्रक जारी केलं आहे. विशेष म्हणजे परीक्षा सुरू होण्याच्या तब्बल 110 दिवस आधी म्हणजेच चार महिन्यांपूर्वीच हे वेळापत्रक …
Read More »नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT)–नांदेड विशेष गाडी धावणार
सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा नांदेड – सणासुदीच्या काळात वाढलेल्या प्रवासी गर्दीचा भार कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेमार्फत नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT)–नांदेड अशी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्रमांक 07031 नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT) विशेष ही गाडी दिनांक 26 ऑक्टोबर 2025 (रविवार) रोजी रात्री 9.00 वाजता नांदेडहून सुटणार असून पुढील दिवशी 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.10 वाजता लोकमान्य …
Read More »Gemini ला कसं कळलं मला ‘त्या’ जागेवर तीळ आहे हे? तरुणी धक्क्यातून सावरेना, युजर्सही बुचकळ्यात
जेमिनीचा हा AI ट्रेंड सध्या जोरदार गाजतोय. अनेकजण साडीतील आपले फोटो अपलोड करताना दिसत आहेत. मात्र कोट्यवधी लोक वापरत असलेल्या या टूलच्या सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. एका इन्स्टाग्राम युजरने आपला अनुभव शेअर केल्यानंतर अनेकांच्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. झलक भवनानी हिने सांगितले की, “इन्स्टाग्रामवरील जेमिनी ट्रेंडने मलाही आकर्षित केले. मी हा ट्रेंड फॉलो करत …
Read More »राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, कारण…
पहा कोणत्या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा? बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून पुढील दोन दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ढील 24 तासांमध्ये प्रामुख्यानं दक्षिण कोकणामध्ये काही दुर्गम भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल. तर, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाच्या मध्यम स्वरुपातील …
Read More »राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित, पहा कुठे कोणाला मिळणार संधी
परभणी – राज्यातील ३४ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदासाठी आज आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तर ठाणे, कोल्हापूर, सांगली, घाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा या ठिकाणी पुरुष मागस प्रवर्गासाठी आरक्षण तर …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com