14/07/26
Breaking News

नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT)–नांदेड विशेष गाडी धावणार

सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा

नांदेड – सणासुदीच्या काळात वाढलेल्या प्रवासी गर्दीचा भार कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेमार्फत नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT)–नांदेड अशी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गाडी क्रमांक 07031 नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT) विशेष ही गाडी दिनांक 26 ऑक्टोबर 2025 (रविवार) रोजी रात्री 9.00 वाजता नांदेडहून सुटणार असून पुढील दिवशी 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT) येथे पोहोचेल.

 

तसेच गाडी क्रमांक 07032 लोकमान्य टिळक टर्मिनल–नांदेड विशेष ही गाडी 27 ऑक्टोबर 2025 (सोमवार) रोजी सायंकाळी 4.10 वाजता एल.टी.टी. वरून सुटेल आणि 28 ऑक्टोबर 2025 (मंगळवार) रोजी सकाळी 11.30 वाजता नांदेड येथे पोहोचेल.

या गाड्या पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, मुरुड, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि ठाणे या स्थानकांवर थांबतील.

 

गाडीमध्ये 20 कोचेस असून त्यात वातानुकूलित (AC), स्लीपर आणि जनरल डबे असतील. भाडे हे सामान्य भाड्याच्या 1.3 पट आकारले जाणार आहे.

या विशेष TOD गाड्यांमुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Check Also

नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये हनिमूनसाठी सजवला First AC कोच; व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वेची मोठी कारवाई

First AC coach of Nandigram Express decorated for a honeymoon First AC coach of Nandigram …