08/11/26
Breaking News

महाराष्ट्र

एकदा लाट उसळली तर दिल्लीकडे जाऊ शकतो- मनोज जरांगे पाटील

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 10 वा दिवस असून राज्य सरकारने अद्यापही त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य न केल्याने उपोषण सुरूच आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला होता, मी त्यांच्याशी फोनवरुन बोललो. हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाल्यानंतर हा फोन आला होते, तेव्हा या जीआरनुसार एकही मराठा …

Read More »

समृद्धी महामार्गावर नेमकी चोरी का होतेय?

महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जाणारा ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ सध्या भयंकर दहशतीखाली आला आहे. अपघातांचं सत्र संपत नाही तोच आता समृद्धी महामार्ग कुख्यात दरोडेखोरांचा सुरक्षित अड्डा झाला आहे. एकाच रात्री सिन्नर आणि शिर्डी दरम्यान चक्क 4 गाड्यांवर हॉलिवूड सिनेमाला लाजवेल अशा पद्धतीनं दरोडा टाकून प्रवाशांना बेदम मारहाण करत लाखो रुपयांचं सोनं आणि रोकड लुटण्यात आली. 100 च्या सुसाट वेगानं …

Read More »

14 हजार 234 ग्रामपंचायती प्रशासकाविना:ग्रामपंचायतींचा कारभार रामभरोसे

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या प्रशासकांची मुदत 23 ऑगस्ट रोजी संपली. मात्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने यासंदर्भात कसलाही आदेश काढला नसल्याने प्रशासनदेखील हतबल झाले असून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना शासन निर्णय येईना…प्रशासन निर्णय घेईना अशी म्हणण्याची वेळ आली आहे. राज्यातील 27 हजार 968 पैकी 14 हजार 234 ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी 2026 रोजी संपल्यानंतर सरपंच परिषद व इतर सरपंच संघटनांनी प्रशासक म्हणून विद्यमान …

Read More »

ई-केवायसी पूर्ण न केल्यास रेशन होणार बंद ….

परभणी, दि. ३ (- सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या व पात्र लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्याचा लाभ पोहोचवण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत विशेष मोहीम राबवली जात आहे. मोहिमेअंतर्गत परभणी तालुक्यातील अंत्योदय अन्न योजना तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील (PHM) रेशनकार्डवर नौद असलेल्या प्रत्येक सदस्याची ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या मुदतीत …

Read More »

एनसीएमसी कार्डच्या रिचार्जच्या नावाखाली भलतीच लुट

राज्याची लाईफलाइन असलेल्या एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या कार्डशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलतीच्या दरातील तिकिट दिले जात नाही. प्रवाशांना थेट पूर्ण रक्कम देऊन तिकीट घ्यावे लागत आहे. त्यामुळे एसटी चालक आणि प्रवाशांमध्ये खटके उडत आहेत. आता, एनसीएमसी कार्डबाबत आणखी बातमी समोर आली आहे. प्रवशांनी १०० रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर त्यांना पूर्ण पैसे …

Read More »

समृद्धी महामार्गावरील दरोड्याचा मुख्य सूत्रधार जाळ्यात

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर २६ ऑगस्ट रोजी झालेल्या रोड रॉबरी प्रकरणात बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंगा येथील किरण अजिनाथ गायकवाड याचा सहभाग समोर आला आहे. पोलिसांनी काल रात्री त्याला त्याच्या घरातून अटक केल्याची माहिती आहे. समृद्धी महामार्ग पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. यात किरण गायकवाडचा किती गुन्हा मध्ये सहभाग आहे त्याच्यासोबत कोण कोण साथीदार आहेत याचा तपास …

Read More »

1 सप्टेंबरपासून LPG सिलिंडरच्या नियमात मोठे बदल

१ सप्टेंबरपासून एलपीजीचे अनेक नियम बदलणार आहेत. सरकारने लागू केलेल्या नियमांचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होईल. जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमतींसह अनेक घटकांचा एलपीजीच्या किमतींवर प्रभाव पडेल. याव्यतिरिक्त, गॅसवरील जीएसटी आणि इतर खर्चांचाही परिणाम होऊ शकतो. एलपीजी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत मूळतः २३ ऑगस्ट होती, परंतु ती ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. अनेक अहवालानुसार, लाखो ग्राहकांनी अद्याप …

Read More »

12 तारखेपर्यंत मुंबईत जा,पण…..मनोज जरांगे यांनी सांगीतली आंदोलनाची दिशा

मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांनी समर्थकांना मुंबईत जाण्याचं आवाहन केलं आहे. “आजपासून 12 तारखेपर्यंत मुंबईत जा, पोलिसांनी नेलं तरी चालेल” असं मनोज जरांगे पाटील बोलले. मुंबईत कसं जायचं, कुठे रहायचं त्याचा प्लानही त्यांनी सांगितला. “मुंबईत विदर्भ, मराठवाडा, कोकणातले लाखो लोक राहतात. एकेका घरात चार-चार, पाच-पाच लोकं राहिले तर 20-25 लाख …

Read More »

अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार

मराठा आरक्षण  आणि कुणबी प्रमाणपत्र, जात पडताळणी समिती या मुद्द्यांवरुन राज्य सरकारला इशारा दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठीच्या वंशावळ जुळवणी समितीला आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, जरांगे पाटलांनी  उपोषणाला सुरुवात केली असून आज …

Read More »

पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

हिंगोली शहरात एका पोलिस उपनिरीक्षकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी (ता. २९ ऑगस्ट) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाखाली ही दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे, आत्महत्या करताना संबंधित अधिकारी पोलिस गणवेशातच होते. या घटनेमुळे संपूर्ण हिंगोली जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. अमोल गंगलवाड (वय ५०) असे या मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव …

Read More »