हिंगोली, (दि. ८ ) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्व विभाग प्रमुखांची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रशासकीय कामांना गती देण्यासोबतच, सर्वसामान्यांच्या योजनांचा आढावा आणि कार्यालयीन शिस्तीबाबत अत्यंत कडक निर्देश देण्यात आले. बैठकीदरम्यान सीईओ विवेक गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. यामध्ये …
Read More »महाराष्ट्र
डिग्रस कऱ्हाळे येथे जिओची रेंज नसल्यामुळे ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत
हिंगोली,दि 08 ः हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे गेल्या अनेक महिन्यापासून जिओ टावर ला अजिबात नेटवर्क नसल्यामुळे डिग्रस कऱ्हाळे येथील ग्रामस्थ वैतागले असून दिनांक 11 जून रोजी हिंगोली औंढा रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार शिवाजी कऱ्हाळे यांनी केला आहे. हिंगोली तालुक्यातील डिग्रस येथे जिओ टावर ची रेंज गेल्या चार ते पाच महिन्यापासून अजिबात व्यवस्थित चालत नाही त्यामुळे …
Read More »हिंगोली पालिकेत कंत्राटी कर्मचारी भरतीचा आढावा; ‘त्या’ उमेदवारांना प्राधान्य!
हिंगोली,दि 08 ः हिंगोली पालिकेच्या सभागृहात सोमवार, ८ जून रोजी कंत्राटी कर्मचारी भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. नगरपालिकेचे गटनेते श्रीराम बांगर आणि मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. नगरपालिकेचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या या भरती प्रक्रियेचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. या बैठकीला आऊटसोर्सिंग कंपनीचे प्रमुख, पालिकेचे …
Read More »चुडावा येथे प्रस्तावित रेल्वे स्लीपर कारखाना रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी
पुर्णा:(सुशील दळवी) चुडावा (ता. पूर्णा, जि. परभणी) : चुडावा येथील गट क्रमांक 271 व 265/1 मधील सुमारे 15.5 एकर कृषी जमिनीवर प्रस्तावित रेल्वे सिमेंट स्लीपर उत्पादन प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रस्तावित प्रकल्पामुळे परिसरातील सुपीक शेती, …
Read More »अतिक्रमण नोटिशींनी घाबरू नका, घरे नियमित करणार: आमदार तानाजी मुटकुळे यांचे आवाहन
हिंगोली: शहरात फलटण मोंढा आणि रिसाला बाजार भागात अतिक्रमण संदर्भात नागरिकांना प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ज्या नागरिकांच्या घराच्या जागेवर सातबारा उताऱ्यामध्ये ‘सरकार’ असे नमूद आहे, अशाच लोकांना या नोटिसा मिळाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, २०११ पूर्वीच्या सर्व रहिवाशांची घरे शासन निर्णयानुसार (GR) नियमित केली जाणार असून, नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरून जाण्याची गरज नाही, असे ठाम प्रतिपादन …
Read More »माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी प्रमोद मुंदडा तर सचिवपदी प्रशांत सोनी यांची निवड
हिंगोली,दि 08 ः हिंगोली जिल्हा महेश्वरी सभेच्या संघटनात्मक निवडणूका 2026 ते 29 या वर्षा करिता घेण्यात आल्या असता त्यात सर्व पदांची बिनविरोध निवड करण्यात आली. निर्वाचन अधिकारी म्हणून ॲड. हरिष मुरक्या व सहाय्यक सिए. रामदेव सोनी, यांनी काम पाहिले.प्रमोद मुंदडा हिंगोली जिल्हा अध्यक्ष, सुरेश धुत जिल्हा उपाध्यक्ष, प्रशांत सोनी जिल्हा सचिव, बालमुकुंद जेथलिया सेनगाव जिल्हा सहसचिव, श्याम मंत्री वसमत जिल्हा …
Read More »परभणी-हिंगोलीत चुरशीची लढत; संख्याबळ असूनही महायुतीसमोर आव्हान
क्रॉस व्होटिंगकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष परभणी / प्रतिनिधी – परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत कागदोपत्री संख्याबळ महायुतीच्या बाजूने असले तरी प्रत्यक्ष निवडणूक मात्र चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीचे उमेदवार सईद खान, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर आणि अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांच्यातील तिरंगी लढतीमुळे निवडणुकीचे राजकीय गणित अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. मतदारसंघातील उपलब्ध आकडेवारीनुसार महायुतीकडे शिवसेना, …
Read More »महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; अपक्ष देशमुख ठरणार का गेमचेंजर?
परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष परभणी / प्रतिनिधी – परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होईल, अशी अपेक्षा असताना अपक्ष उमेदवार सुशील सुरेशदादा देशमुख यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक तिरंगी झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणे नव्याने मांडली जात असून ही लढत अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीकडून शिवसेना …
Read More »पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या लातूर जिल्ह्यात जुगार व मटका अड्डयांवर धाडी
हिंगोली,ता 06 ः नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी लातूर जिल्हयात पोलीस पथकाची रवानगी केली होती. सदर पथकाने, दिनांक 05/06/2026 रोजी, लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरातील शिवाजी चौक परिसरात चालू असलेल्या दोन मटका बुकींवर कारवाई करत, 24,320/- रुपयांची रोकड, 43 हजार रुपयांचे (6) मोबाईल व 48,600/- रुपयांचे संगणक साहित्य असा एकूण 1,15,920/- रुपयांचा मुद्देमाल …
Read More »शेवाळा येथे 30 वय वंदना कार्ड वाटप
हिंगोली, (दि. ६ ): जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानात ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड १०० टक्के काढून मोहीम स्वरूपात काम करण्याचे निर्देश नुकतेच दिले त्यानुषंगाने आज प्राथमिक आरोग्य केंद्र आखाडा बाळापूर अंतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्र शेवाळा येथे 30 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढून वाटप करण्यात आले. …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com