09/05/26
Breaking News

महाराष्ट्र

परभणीत व्हाईस ऑफ मिडीयाचे मंगळवारी धरणे आंदोलन

परभणी,दि 03 (प्रतिनिधी)ः राज्यभरात पत्रकारांवर हल्ला करण्यासह धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. या विरोधात व्हाईस ऑफ मीडियाने राज्यभर धरणे आंदोलन पुकारले आहे. याच अनुषंगाने परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.यात नऊ तालुक्यांचे पदाधिकारी,सदस्य सहभागी होणार आहेत अशी माहीती राज्याचे कार्याध्यक्ष श्री. विजय चोरडिया यांनी दिली. व्हाईस ऑफ मीडियाचे राज्यसहचिटणीस  श्री. …

Read More »

अवकाळीमुळे पिकांचे मोठे नुकसान,महसूलमंत्र्यांनी केली घोषणा

राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित यंत्रणांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांना …

Read More »

लाडकी बहीण योजनेत 71 लाख महिला अपात्र

राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आता मोठ्या वादाच्या भोऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेत तब्बल 71 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या अपात्र महिलांच्या खात्यावर गेल्या 20 महिन्यांत सरकारने सुमारे 21 हजार 300 कोटी रुपये जमा केले आहेत. 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू असून महिलांच्या खात्यात दर …

Read More »

पत्रकारांच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन तीव्र करणार-विजय चोरडिया

जिंतूर,दि 02  राज्यभरात पत्रकारावर होत असलेले विविध हल्ले, पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणे यासह पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी राज्यस्तरावर आंदोलन करण्यात येत असून शासनाने याची दखल न घेतल्यास राज्यभरामध्ये पत्रकार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा व्हॉइस ऑफ मीडिया चे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी दिला. पत्रकारांच्या विविध मागण्याच्या संदर्भात दि 2 एप्रिल गुरुवार रोजी तहसील ऑफिस जिंतूर येथे आयोजित करण्यात …

Read More »

वृद्धाश्रमातील वृद्धांना फळ वाटप करून दिला गायनाचा आनंद

“शाम ए सरगम” संगीत परिवाराचा अभिनव उपक्रम सेलू / नारायण पाटील – हिंदू नववर्षाच्या आरंभी दि. २९ मार्च २०२६ रविवार सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ‘कामदा एकादशी’ निमित्ताने भगवंताच्या नुसत्या मुर्तीचे पूजन करुन न थांबता,”जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले” या प्रमाणे सजीव मनुष्य रुपी भगवंताच्या सेवेत ईश्वर आहे या संकल्पनेतून पाथरी जवळील ॐकार वृध्दाश्रमातील 35 वृध्द …

Read More »

अबब… ५६ गॅस सिलिंडरची चोरी

५६ सिलिंडरसह पावणे चार लाखांचा मुद्देमाल लंपास; खवणे पिंपरी येथील घटना पाथरी / प्रतिनिधी – तालुक्यातील खवणे पिंपरी येथे चोरट्यांनी गॅस एजन्सीच्या गोदामावर डल्ला मारत तब्बल ५६ भरलेले गॅस सिलिंडर चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुमारे ३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार (दि. २८ मार्च) रात्री ते …

Read More »

नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून,दोन मे पासून सुट्या

: यंदा राज्यातील सर्व शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ हे १५ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. शिक्षण संचालनालयाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी यंदाच्या उन्हाळी सुटी व नवीन शैक्षणिक वर्षाबाबत आदेश जारी केला आहे. शैक्षणिक वर्ष २५-२६ अखेरच्या टप्प्यात आहे. बुधवारपासून एप्रिल सुरू होत आहे. जिल्हा परिषद, सर्व माध्यमांच्या व सर्व …

Read More »

महिला गर्भाशयाची गाठ काढायला गेली; पण भूल देऊन केलं भलतंच कांड

पुणे: डॉक्टरला देवाचा दर्जा दिला जातो, कारण ते अनेकांना अगदी मृत्यूच्या दारातून परत आणतात. मात्र, पुण्यात याच डॉक्टरांच्या हलगर्जीपणाची एक धक्कादायक घटना समोर आली. मांजरी बुद्रुक येथील ‘साई केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये एका ३५ वर्षीय महिलेची साधी गाठ काढायची होती. मात्र, गाठ काढायच्या नावाखाली चक्क तिचे संपूर्ण गर्भाशय काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आता अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुमित …

Read More »

उदयोगशील विद्यार्थी घडवणे ही काळाची गरज-डॉ. अमोल देशपांडे

सुशिल दळवी) पूर्णा ,ता 29 ः वाढत्या बेरोजगारीच्या आव्हानात्मक परिस्थितीचा यशस्वी मुकाबला करण्याकरिता आणि सर्वांनाच नोकऱ्या आजच्या काळात मिळणे अशक्य असल्याकारणाने उद्योग विश्वात विद्यार्थी पाय रोवून उद्योगशील कसा होईल ? याकरिता उद्योगशील संस्कार आणि वयवसाय निवडीचे स्वातंत्र्य याबाबत जाणीव जागृती करून उदयोगशील विद्यार्थी घडवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हास्तरीय सुलभक मारोती कदम यांनी केले . ते व्यवसाय शिक्षण व …

Read More »

देशात लॉकडाउन लागणार नाही:केंद्र सरकारची माहीती,केवळ अफवा असल्याचे स्पष्ट

पश्चिम आशियातील संकटामुळे देशात देशव्यापी लॉकडाऊन लागू केला जाणार नाही, असे केंद्र सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले. सरकारचे तीन वरिष्ठ मंत्री—निर्मला सीतारामन, किरण रिजिजू आणि हरदीप पुरी—यांनी निवेदने जारी करून या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे रिजिजू यांनी नमूद केले आणि खुद्द पंतप्रधान मोदी स्वतः या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग …

Read More »