09/11/26
Breaking News

हिंगोलीतील हनुमान नगरात तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा 

हिंगोली : हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख  आमदार संतोष बांगर तसेच युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम व नगरसेवक श्याम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव, हनुमान नगर यांच्या वतीने यंदा नवरात्रोत्सवानिमित्त भव्य धार्मिक देखाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यावर्षी नांदेड, परभणी, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा तिरुपती बालाजी मंदिराचा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात या देखाव्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

हनुमान नगर परिसरातील नागरिकांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी कुलस्वामिनी नवदुर्गेचे दर्शन व तिरुपती बालाजी मंदिराच्या देखाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम, नगरसेवक श्याम कदम तसेच हनुमान नगरवासीयांच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

ऊसतोड कामगारांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी

प्रतिनिधी | ०९ नोव्हेंबर दिवाळीचा सण हा सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. …