11/11/26
Breaking News

चिरागशहा तलाव विकासकामाची आमदार तानाजी मुटकुळे यांच्याकडून पाहणी

हिंगोली :
हिंगोली शहरातील प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या चिरागशहा तलावाच्या सुरू असलेल्या विकासकामाची आमदार तानाजी मुटकुळे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी विकासकामाच्या सद्यस्थितीची माहिती घेत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.

हिंगोली शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या चिरागशहा तलावाच्या विकासाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. या कामाची पाहणी करताना आमदार तानाजी मुटकुळे यांनी कामाचा आढावा घेतला. तसेच तलावाच्या विकासाचे काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणारा हा तलाव विकास प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी कामाला गती देण्यावर त्यांनी भर दिला.यावेळी नगरसेवक राजेश गोटे, नगरसेवक हमीद प्यारेवाले, पृथ्वी शिवाजी मुटकुळे आदी उपस्थित होते.

Check Also

वाघाळा येथे ५० टक्के अनुदानावर ११ पशुपालकांना कडबा कुट्टी संयंत्रांचे वाटप

पाथरी (प्रतिनिधी) विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत वाघाळा येथे सोमवारी 9 रोजी पशुपालकांना ५० टक्के अनुदानावर …