परभणी : शहरातील ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या विज्ञान केंद्रात दिवाळी सणाच्या निमित्ताने सैनिक कृतज्ञता सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी परिसरातील सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा यथोचित सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर, मनपा सदस्य डॉ.केदार खटिंग, डॉ. रामेश्वर नाईक, ज्ञानेश्वर येळे, जि प सदस्य रितेश काळे, डॉ. विजय बोंडे, डॉ. महेश कडे, श्री विष्णूदास चापके, जय हिंद फाउंडेशन, बारामतीचे सचिव सचिन कुंभार आदी उपस्थित होते.
महाराज दस्तापुरकर यांनी शेतकरी व सैनिक यांच्या विषयी नेहमी कृतज्ञ राहिले पाहिजे अशी शिकवण वारकरी संप्रदाय नेहमी देतो. असे सांगितले. तर शहीद जेवणाच्या आई व पत्नीच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना आधार देणे हेच खरे देशप्रेम आहे. महाराष्ट्रातील 45 शहीद कुटुंबीयांपर्यंत मला पोहोचता आले याचे मला समाधान आहे. वीर जवानांच्या कुटुंबीयांवर प्रेम करणे हेच खरे देशप्रेम आहे. प्रतिपादन ज्ञानेश्वर येळे यांनी केले.
प्रसंगी सातारा जिल्ह्यात फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री ज्ञानेश्वर येळे यांचा त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी विशाल आरहते,अक्षय कदम, कृष्णा सुभाषराव देशमुख,खिस्ते दीपक विष्णू, होळकर श्रीकांत रामराव,चैतन्य सुभाष राडकर, वैरागर गोविंद मनोहरराव, शेंडगे अर्जुन शिवाजीराव ,अर्जुन पांडुरंग खटिंग ,किरण वाघ ,अंकुश चापके ,नामदेव चापके हे सैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष ढगे यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर सोनुनकर यांनी केले.
काय कार्यक्रमाचे आयोजक ज्ञानेश्वर खटिंग, संतोष शिंदे, सुधीर सोनुनकर, सुभाष ढगे, माधव गव्हाणे, राजकुमार वाघ, राम पतंगे, योगेश देशमुख, मंगेश कुलकर्णी, हनुमान पवार, वैभव देशमुख, उपेंद्र फडणवीस , ऋषिकेश गट्टी, सुदर्शन चापके, सिद्धेश्वर जाधव, महेश साखरे,अँड दत्ता झुटे , अनिल कोणगुलवार, नरहरी वाघ , मंचक दुधाटे आदीनी परिश्रम घेतले.
Shabdraj www.shabdraj.com