22/11/26
Breaking News

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरात भूकंपाचा विशेष अभ्यास सुरू

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027-28 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरातील भूकंपविषयक हालचालींचा विशेष अभ्यास सुरू करण्यात आला आहे. लाखो भाविकांची संभाव्य गर्दी आणि कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. राज्य शासनाच्या विनंतीवरून भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) यासाठी त्र्यंबकेश्वरला विशेष पथक पाठवले आहे. त्या पथकाकडून त्र्यंबकेश्वर परिसरात तसेच त्याच्या सुमारे अनेक किलोमीटरच्या परिघात चार अत्याधुनिक यंत्रांच्या माध्यमातून चोवीस तास भूगर्भातील हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. जानेवारी 2017 पर्यंत हा अभ्यास सुरू राहणार असून त्यानंतर एक अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार असल्याची माहिती जीएसआयचे महासंचालक दिनेश गणवीर यांनी नागपुरात दिली.

* नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात देशभरातून लाखो भाविक, साधू-महंत आणि पर्यटक दाखल होण्याची शक्यता आहे.
* त्यासाठी राज्य सरकारने रस्ते, पूल, घाट तयार करणे सुरू केले आहे.
* पाणीपुरवठा, वीज, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेसह विविध पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहे.
* लाखो भाविकांच्या आणि केल्या जाणाऱ्या बांधकामाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या परिसरातील भूगर्भीय स्थिती तसेच संभाव्य भूकंपविषयक धोक्यांचा अभ्यास करण्याची गरज होती.
* त्यानुसार राज्य सरकारच्या विनंतीनंतर जीएसआयकडून ही निरीक्षण मोहीम राबवली जात आहे.
* जीएसआयचे एक पथक सध्या त्र्यंबकेश्वर परिसरात असून चार यंत्रांच्या साहाय्याने भूगर्भातील हालचालींमुळे निर्माण होणाऱ्या कंपनांची सलग नोंद घेतली जात आहे.
* त्या नोंदीचे विशेष संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून संकलन आणि विश्लेषण करण्यात येणार आहे.
* तीन महिन्यांच्या निरीक्षणानंतर या परिसरातील भूकंपविषयक हालचाली आणि संभाव्य धोक्यांबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाईल.

STORIES YOU MAY LIKE

Check Also

सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती

  सोने दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत असल्याचं चित्र आहे, आज देखील पुन्हा …