09/11/26
Breaking News

चेतन भूतनर व सायली गीते यांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

बाळु जाधव 
हिंगोली,दि 04
हिंगोली तालुक्यातील सौ. सती मनकर्णिकाबाई पारनेरकर विद्यामंदिर, हिंगणी या शाळेने आपल्या क्रीडा क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीची परंपरा कायम राखली आहे. शाळेच्या कामगिरीमध्ये आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला असून शाळेचे दोन विद्यार्थी सलग दुसऱ्या वर्षी विभागीय स्तरावर झेपावले आहेत.

हिंगोली जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी करून इयत्ता १० वी तील विद्यार्थी कु. चेतन भूतनर आणि कु. सायली गीते यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. या विजयानंतर आता दोन्ही विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावरही आपले वर्चस्व सिद्ध करत थेट विभागीय स्तरासाठी निवड मिळवली आहे.विशेष म्हणजे या दोन्ही विद्यार्थ्यांची सलग दुसऱ्या वेळेस विभाग स्तरावर निवड झाली असल्याने ही शाळेसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे.

या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सर्व संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, गावातील नागरिक आणि पालक वर्गाकडून दोन्ही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.ग्रामीण भागातील शाळा असूनही क्रीडा क्षेत्रात सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या पारनेरकर विद्यामंदिराचे सर्वत्र कौतुक होत असून या यशाबद्दल शाळेच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले जात आहे. विभागीय स्तरावरही हे दोन्ही मल्ल हिंगोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Check Also

ऊसतोड कामगारांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी

प्रतिनिधी | ०९ नोव्हेंबर दिवाळीचा सण हा सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. …