सेलु,दि 11 ः येथील नूतन विद्यालयात पदोन्नतीने उपक्रमशील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक गणेश शेषराव माळवे यांची गुरुवार ( दि. १० ) रोजी पर्यवेक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन विद्यालयात क्रीडा शिक्षक पदावर ३० वर्षे प्रदिर्घ सेवेत अनेक राष्ट्रीय व राज्य खेळाडूंना मार्गदर्शन करत, सेलू तालुक्यात अनेक राज्य क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. विविध क्रीडा सुविधा निर्माण केल्या आहेत.खेलो इंडिया बीच …
Read More »महाराष्ट्र
पूर्णेत जलकुंभ बांधकामाला अनाधिकृत विजपुरवठा,प्रशासनाचे अभय
पुर्णा,दि 10 (प्रतिनिधी) पूर्णा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या शहरात चार ठिकाणी टाक्यांचे बांधकाम सुरू आहे संबंधित गुत्तेदाराने अनधिकृत विद्युत पुरवठा घेत वीजचोरी केली सदरील गुत्तेदारास चार महिन्यापूर्वी दंड ठोठावण्यात आला परंतु अधिकृत मीटर न घेता पुन्हा वीजचोरी करताना दिसून आल्याने संबंधित गुत्तेदारास पुन्हा दंड आकारण्यात आला परंतु संबंधित गुत्तेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने सदरील गुत्तेदारावर राजकीय वरदहस्त असल्याने अधिकारी मूग …
Read More »जिंतूरात आयुष्यमान सेवा सप्ताहात पंधराशे कार्ड वाटप,डॉ. समीर जानिमियाँ पुढाकाराने उपक्रम यशस्वी
जिंतूर / प्रतिनिधी जिंतूर : शहरातील सामाजिक उपक्रमांना नवी दिशा देण्याकरीता पालकमंत्री ना मेघना बोर्डीकर यांच्या अभिष्टचिंतन दिनाचे औचित्य साधून शहरात आयुष्यमान सेवा सप्ताहाच्या निमित्ताने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉ.समीर जनिमिया यांच्या पुढाकाराने आरोग्यविषयक जनजागृतीसह आयुष्यमान कार्ड वाटपाची विशेष मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत तब्बल पंधराशे लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेची कार्डे वितरित करण्यात आली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अभिष्टचिंतन …
Read More »जिल्हा परिषदेत आठव्या पोषण पंधरवडा अभियानाचा शुभारंभ
परभणी,दि 09 ः बालकांच्या पहिल्या सहा वर्षातील बुद्धीचा विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पोषण पंधरवडा अभियानाचा शुभारंभ परभणी जिल्हा परिषद येथे उत्साहात करण्यात आला. गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी जिल्हा परिषद परभणी येथील सभागृहामध्ये महिला व बालविकास सभापती ऐश्वर्या अजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी …
Read More »जिल्ह्यातील सर्व शाळांची होणार पटपडताळणी
परभणी,दि 08 ः जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवी आणि इयत्ता नववी ते अकरावी च्या विद्यार्थ्यांची पट पडताळणी दिनांक 11 ते 22 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक सविता बिरगे यांनी दिली आहे. सदरची पट पडताळणी करण्या बाबतच्या सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी आयोजित केलेल्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी परीक्षेच्या …
Read More »प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदवा; युवकांना आवाहन
परभणी, दि. 08 : भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉरपोरेट अफेअर्स अंतर्गत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरु करण्यात आली असून जिल्ह्यातील युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत खंदारे यांनी केले आहे. या योजनेसाठी 18 ते 25 वयोगटातील पुर्णवेळ शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण किंवा नोकरीत नसलेला भारतीय युवा वर्ग पात्र आहे. या योजनेअंतर्गत देशातील …
Read More »वॉटरपार्कमध्ये महिलेचा भीषण अपघात,अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी
पुणे : शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रातील वॉटरपार्कमध्ये व्यवस्थापकांच्या निष्काळजीपणामुळे गंभीर दुर्घटना घडली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेकडे दु्र्लक्ष केल्याने वॉटरपार्कमध्ये एका महिलेचा भीषण अपघात झाला आहे. अश्विनी संदीप नप्ते (वय 37, रा. करंदी) असे या महिलेचे नाव असून या अपघातात त्यांचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी नप्ते या आपल्या कुटुंबासह सुटीचा आनंद …
Read More »परभणीत एकाच दिवशी दोन लाचखोरांवर कारवाई
परभणी,दि 08 परभणी जिल्ह्यात एकाच दिवशी दोन लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.एका वैद्यकीय अधिक्षकांसह भूमी अभिलेख मधील वरिष्ठ लिपिकास ताब्यात घेण्यात आले आहे. पालम येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अधीक्षक डॉ. रमेश खंदारे यांचा रुग्णालयातील कापड स्वच्छता कंत्राटदार यांच्याबरोबर व्यवहार होता, त्याच अनुषंगाने त्यांनी त्याला 50 हजारांची लाच मागितली. त्यानुसार, कंत्राट दाराकडून 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना एसीबीच्या एका …
Read More »हायवाच्या धडकेत सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू.. एक जण जखमी
सोनपेठ (प्रतिनिधी) सोनपेठ शहरातील सोनखेड परिसरात दि. ८ एप्रिल बुधवार रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास एका हायवा ट्रकचा अपघात झाला. या अपघातात न.प.स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे. सोनपेठ शहरातील सोनखेड परिसरात नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांना हायवा ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तुळसाबाई दत्ता पाडुळे (वय ४५ वर्ष)यांचा जागीच मृत्यू …
Read More »बँकखात्यातून ६ लाखांची ऑनलाईन फसवणूक,बँकेविरोधात ग्राहकाचे आमरण उपोषण सुरू
पाथरी,दि 08 परभणीतीलएका नामांकित बँकेतील खात्यामधून सहा लाखाहून अधिकची रक्कम ऑनलाईन परस्पर काढून घेतल्याने फसवणूक झाल्याचे म्हणून सदरील बँकेच्या विरोधात पाथरी शहरातील एका खातेधारकाने परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. अनीस खान युनूस खान पठाण (रा. आझाद नगर, पाथरी) असे फसवणुक झालेल्या खातेदाराचे नाव असून त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार ३ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान त्यांच्या खात्यातून सुमारे …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com